मुंंबई । राज्यात दिवाळीनंतर निवडणूकांचे रणशिंग फुंकले जाणार असून त्यादृष्टीने निवडणूक आयोगानेही तयारी सुरू केली आहे. गट, गण जाहीर केल्यानंतर आता महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून विविध गटांसाठी आरक्षणाची विभागणी करण्यात आली आहे. बघूया कोणत्या जिल्हयात कोणत्या प्रवर्गासाठी जिल्हा परिषद अध्यक्षपद राखीव ठेवण्यात आले आहे.
मुख्य जिल्हानिहाय आरक्षण
ठाणे – सर्वसाधारण (महिला)
पालघर – अनुसूचित जमाती
रायगड – सर्वसाधारण
रत्नागिरी – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सिंधुदुर्ग – सर्वसाधारण
नाशिक – सर्वसाधारण
धुळे – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
नंदूरबार – अनुसूचित जमाती
जळगाव – सर्वसाधारण
अहमदनगर – अनुसूचित जमाती (महिला)
पुणे – सर्वसाधारण
सातारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सांगली – सर्वसाधारण (महिला)
सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
कोल्हापूर – सर्वसाधारण (महिला)
छत्रपती संभाजीनगर – सर्वसाधारण
जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
बीड – अनुसूचित जाती (महिला)
हिंगोली – अनुसूचित जाती
नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग
धाराशिव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
लातूर – सर्वसाधारण (महिला)
अमरावती – सर्वसाधारण (महिला)
अकोला – अनुसूचित जमाती (महिला)
परभणी – अनुसूचित जाती
वाशिम – अनुसूचित जमाती (महिला)
बुलढाणा – सर्वसाधारण
यवतमाळ – सर्वसाधारण
नागपूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
वर्धा – अनुसूचित जाती
भंडारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग
गोंदिया – सर्वसाधारण (महिला)
चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला)
गडचिरोली – सर्वसाधारण (महिला)
निवडणूक आयोगाची बैठक
दरम्यान, देशभरातील निवडणुका अधिक प्रभावी आणि पारदर्शक करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकार्यांची बैठक नवी दिल्ली येथे आयोजित केली. या वेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसेच निवडणूक आयुक्त उपस्थित होते.
बैठकीत घेतलेले महत्त्वाचे निर्णय:
मतदार यादीत एकही पात्र नागरिक वगळला जाणार नाही, याची हमी. प्रत्येक मतदान केंद्रावर जास्तीत जास्त १२०० मतदारांपर्यंतच संख्या ठेवण्याचे नियोजन. मतदार यादीचे पूर्ण डिजिटायझेशन आणि ऑनलाइन उपलब्धता. जिल्हा निवडणूक अधिकारी, ERO, AERO, BLO आणि BLAs यांचे प्रशिक्षण व नियुक्ती यांचा आढावा. निवडणूक आयोगाने नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्याच्या प्रक्रियेत सोपेपणा व पारदर्शकता ठेवण्यावर भर दिला आहे.











