राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे

मुंबई । राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून, हवामान विभागाने पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात तयार होणार्‍या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात विशेषतः कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोकणात रेड अलर्ट, मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट
रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांसाठी २४ आणि २५ जुलै रोजी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबई शहर व उपनगरांसाठी २४ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून पावसाची तीव्रता अधिक वाढणार असल्याचा अंदाज आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा
पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरही मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत दरडी कोसळण्याचा आणि नद्यांची पातळी वाढण्याचा धोका असल्याने स्थानिक यंत्रणा सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विदर्भ व मराठवाड्यातही पावसाचा जोर वाढणार
विदर्भ व मराठवाड्यात देखील पावसाची तीव्रता वाढणार असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये २३ ते २६ जुलै दरम्यान दमदार सरींचा अंदाज आहे.

असा आहे अंदाज
गुरुवार, २४ जुलै २०२५
रेड अलर्ट: रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, मुंबई शहर, पुणे, सातारा, कोल्हापूर
ऑरेंज अलर्ट: ठाणे, पुणे, सातारा
येलो अलर्ट: सांगली, नाशिक, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा

शुक्रवार, २५ जुलै २०२५
रेड अलर्ट: रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग
ऑरेंज अलर्ट: ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, नागपूर, भंडारा
येलो अलर्ट: पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर

शनिवार, २६ जुलै २०२५
ऑरेंज अलर्ट: रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, मुंबई, नाशिक, पालघर, गडचिरोली
येलो अलर्ट: पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर

error: Content is protected !!