NMC Nashik : मतदार यादीत ८६ हजार दुबार मतदार, मनसेचे निषेध आंदोलन

नाशिक । नाशिक महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीत सुमारे ८६ हजार मतदारांची नावे दुबार आढळल्याने मनसेने याचा निषेध नोंदवत आंदोलन केले.

विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाने शहरातील बोगस मतदारांवरून रान उठवले होते. शिवाय जिल्हाधिकार्‍यांना जिल्ह्यातील दुबार व बोगस मतदारांची यादी दिली होती. दुबार मतदारांची नावे उघड झाल्याने पालिका निवडणुकीत पुन्हा बोगस मतदान होण्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

महापालिकेच्या प्रारूप यादीत दुबार नावे आढळून आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रभाग २० मध्ये आंदोलन करत निषेध नोंदविण्यात आला. प्रभाग २० मध्ये सुमारे ७ हजार मतदार दुबार आढळून आल्याचा आरोप करण्यात आला.

यावेळी अध्यक्ष सुदाम कोंबडे, विभाग अध्यक्ष बंटी कोरडे, शहर उपाध्यक्ष अ‍ॅड. नितीन पंडित, जिल्हा उपाध्यक्ष संतोष सहाणे, पक्ष निरीक्षक प्रमोद साखरे, नितीन धानापुणे, शाम गोहाड, आदित्य कुलकर्णी, विजय बोराडे, योगेश शिरसाठ, गोरख शिंदे, अनुप लोखंडे, मीनाक्षी घोलप, निधी पंडित, मीरा आवारे आदींसह मनसैनिक उपस्थित होते.

error: Content is protected !!