नाशिक : दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशीचा. या दिवशी धन, आरोग्य यासाठी पूजा केली जाते. यानिमित्ताने नाशिकच्या वैद्य विक्रांत जाधव यांच्या कार्यालयात दुर्मिळ नारळ आणि 100 वर्षापूर्वीचे खल पूजन करण्यात आले. नेमके हे नारळ काय आहे त्याच वैशिष्ट्य काय आहे जाणून घेवूया..
अशोक स्तंभ येथील सुशीला आयुर्वेद चिकित्सालयात शुक्रवारी (ता. १८) ३४ वे धन्वंतरी पूजन नाशिक महानगर विकास प्राधिकरण आयुक्त जलज शर्मा, महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या हस्ते सकाळी अकराला करण्यात आले. यानिमित्त जगातील अतिदुर्मिळ असे कोको-दे-मेर या समुद्रातील नारळाची पूजाही करण्यात आली.
जगातील अत्यंत दुर्मिळ अशा या फळाच नाव आहे सेशेल्स कोको दे मेरे हे झाड सेशेलमधील प्रस्लिन आणि क्यूरिअस बेटांवर आढळून येते.
या झाडाचे बी जगातील सर्वात मोठे आणि जड बीज मानले जाते. पूर्वी हे बी समुद्रात तरंगताना दिसल्याने लोकांना वाटले हे झाड समुद्राच्या तळाशी उगवते, म्हणून त्याला समुद्रातील नारळ असे नाव देण्यात आले.
या बीजाला पूर्ण वाढ होण्यासाठी सुमारे 7 वर्ष लागतात. हे झाड पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते. या झाडाच्या संरक्षणासाठी सेशेल्स सरकारने कठोर नियम केले आहेत. कोको द मेरे हे सेशेल्सचे राष्ट्रीय प्रतीक मानले जाते. हे लक्ष्मीचं फळ देखील मानलं जातं











