‘लाडकी बहिण’ योजनेबाबत मोठी बातमी

नाशिक । राज्य शासनाने विधानसभा निवडणूकीपुर्वी लाडकी बहिण योजना सुरू केली. मात्र आता या योजनेतील लाभार्थ्यांचे निकष बदलण्यात आले आता तर या योजनेतील लाभार्थी महिलांना ५०० रूपये देण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. यावरून आता राजकीय वादळ उठले असून विरोधकांनी या योजनेवरून सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.

नाशिकमध्ये निर्धार मेळाव्या दरम्यान आदित्य ठाकरे यांनी लाडकी बहिण योजना गुंडाळली जाणार असे सांगत सरकारचा प्लॅनच सांगितला.

ठाकरे म्हणाले, १०० दिवस झाले पहिला हनिमुन पिरेड मानला जातोे. सरकारने एकतरी चांगली योजना आणली का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.लाडकी बहीण योजना ५०० रूपयांवर आली. आपण तर ३ हजार रूपये देणार होतो. महायुतीच्या घटक पक्षांनी तर निवडणुकीपूर्वी २१०० रूपये देऊ असे सांगितले होते. परंतू सत्तेवर आल्यानंतर एकसुध्दा गोष्ट बजेटमध्ये आणत नाहीत.

देवेंद्र फडणवीस बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत होते, आमचे सरकार येणार, सरकार आल्यानंतर हे करू वगैरे काय काय सांगत होते. शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळणार, सातबारा कोरा करणार अशा घोषणा केल्या. प्रत्यक्षात काय झाले हे फडणवीसांचे सरकार आहे.

एकनाथ शिंदे तिथे चिकटण्यासाठी चिकटले आहेत. कारण बाहेर पडले तर तुरूंगात जातील. आता अमरावतीहून थेट गावी जाणार आहेत. कारण पुन्हा नाराजी नाटय सुरू झाले आहे. आता पुढचं मी काही बोलत नाही असे म्हणत आदित्य ठाकरेंनी टोलाही लगावला.

error: Content is protected !!