आदित्य ठाकरेंच्या स्वागताप्रसंगी नेमकं काय घडलं

नाशिक । नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे निर्धार शिबीर संपन्न होत आहे. यानिमित्ताने पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, आदिज्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख नेते नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. या निर्धार शिबीराचे उदघाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, आदित्य ठाकरे यांचे शिबीराच्या कार्यक्रमस्थळी आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी मंचावर मोठी गर्दी झाली. या गर्दीचा भार न पेलवल्याने मंचावरील टेबल तुटल्याने खाडकन आवाज झाला. या आवाजाने पदाधिकार्‍यांना तातडीने व्यासपीठावरून उतरविण्यात आले.

शिवसेना निर्धार शिबीरानिमित्ताने विभागातून शिवसैनिक, कार्यकर्ते नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी आदित्य ठाकरें यांचे आगमन होताच उपनेते सुधाकर बडगुजर, जिल्हाप्रमुख डी.जी.सुर्यवंशी, महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांनी त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी केली होती.

व्यासपीठावर मोठया प्रमाणात गर्दी झाल्याने हा भार न पेलवल्याने मंचावरील एक टेबल तुटल्याचा आवाज झाला. हा प्रकार लक्षात येताच पदाधिकार्‍यांना खाली उतरविण्यात आले. व्यासपीठावरून सर्व उतरल्यानंतर आदित्य ठाकरे यांचे भाषण सुरू झाले.

दरम्यान महाराष्ट्र कुठे चाललाय या विषयावर आदित्य ठाकरे यांनी आपले विचार मांडले. शिबीराचे प्रथम सत्र संपल्यानंतर व्यासपीठाचे काम हाती घेण्यात आले. नुकसानगग्रस्त टेबलाचा शोध घेत हा टेबल हटविण्यात आला तसेच नविन टेबल टाकण्यात येऊन टेबल मंच अधिक मजबुत करण्यात आला.

error: Content is protected !!