जिल्हयात राजस्थान, हरियाणातील ८ लाख कुटूंब वास्तव्यास, काय केली मागणी

नाशिक । नाशिकवरून राजस्थानला जाण्यासाठी स्वतंत्र रेल्वे सुरू करा अशी मागणी राजस्थान, हरियाणा, गुजरात प्रवासी संघाकडून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत संघटनेच्या वतीने केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना निवेदन दिले आहे.


यावेळी राजस्थान, हरियाणा, गुजरात प्रवासी संघाचे तेजपाल सिंह सोढा, राम सिंह राजपूत, बलवीरसिंह शेखावत, रोशनसिंह राजपूत, महेंद्रसिंह राजपूत, भगवत राजपूत यांच्यासह संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संघटनेच्या वतीने तेजपाल सिंग सोढा म्हणाले की, नाशिक ही कुंभ नगरी असून धार्मिक पर्यटनासाठी राजस्थान येथून हजारो भाविक नाशिकमध्ये येत असतात मात्र नाशिकहून राजस्थानसाठी स्वतंत्र रेल्वे नसल्याने प्रवाशी वर्गाचे प्रचंड हाल होतात.


नाशिक शहर आणि जिल्ह्यात राजस्थान, हरियाणा, गुजरात येथील सुमारे ८ लाख कुटुंब वास्तव्यास आहेत. तरी देखील ट्रेन नसल्याने नाशिक ते राजस्थान अशी स्वतंत्र रेल्वे असणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. यावेळी राजस्थान येथील नागरिक नाशिक जिल्ह्यात एवढ्या संख्येने असताना स्वतंत्र रेल्वे नसल्याने याबाबत आपण केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून गाडी सुरू करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू असे आश्वासन प्रवासी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनादिले. सदर विषयावर बातमी तयार करा

error: Content is protected !!