नाशिक । आगामी सिहंस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून ऑक्टोबर २०२६ रोजी या सिहंस्थ सोहळ्याला सुरवात होणार आहेत. श्री क्षेत्र नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे भरणारा कुंभमेळा हा साधारणतः १३ महिने कालावधीचा असतो मात्र, यंदा तब्बल ७१ वर्षांनी अभूतपूर्व योग येणार आहे. त्यामुळे यंदा कुंभमेळा हा 22 महिन्यांचा असणार आहे
यंदा गुरू ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केल्यानंतर तो दोन वेळा वक्री होणार आहे आणि त्यानंतर तो नियमित भ्रमण करून पुढील २४ जुलै २०२८ रोजी प्रवेश करणार आहे त्यामुळे यंदा २२ महिने कुंभमेळा पर्व असणार आहे.
दर १२ वर्षांनी कुंभमेळा होत असतो. हिंदू धर्मात कुंभमेळ्याला मोठं महत्त्व आहे. हा कुंभमेळा हरिद्वार, इलाहबाद, उज्जैन आणि नाशिकमध्ये भरतो. जेथे देश-विदेशातून अनेक भाविक येत असतात. दरम्यान २०२६ मध्ये नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा होणार आहे.
त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्याची तारीख जाहीर करण्यात आली होती मात्र नाशिक कुंभमेळयाची तारीख जाहीर करण्यात आली नव्हती अखेर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती या तारखा आज जाहीर करण्यात आल्या.
यंदा वर्षभराने म्हणजेच १३ महिन्यांची गुरू बदल होउन कुंभपर्व संपणार आहे. कारण २०२८ पर्यंत दोन वेळा गुरू वक्री होईल. त्यानंतर २४ जुलै २०२८ रोजी दुपारी ३ वाजून ३६ मिनिटांनी तो पुढील राशीत मार्गस्थ होईल त्यामुळे त्या दिवशी ध्वजावतरण अर्थात कुंभपर्वाची ध्वजा उतरवली जाईल.
काय आहे नाशिक कुंभमेळ्याचं महत्त्व ?
भारतात दर तीन वर्षांनंतर एकदा या पद्धतीनं बारा वर्षांत नाशिक ( त्र्यंबकेश्वर), प्रयागराज, उज्जैन आणि हरिद्वार या चार वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री पूर्ण कुंभमेळा भरतो. कुंभमेळा हा धार्मिक उत्सव असून यासाठी कोणालाही औपचारिक निमंत्रण दिलं जात नाही. असे असले तरी करोडो भाविक या सोहळ्याला उत्साहात सहभागी होतात.
या कुंभमेळ्यात शाही स्नानाला विशेष महत्व आहे. यावेळी नदीमध्ये स्नान करून सूर्याला अर्घ्य देत नदीची पूजा केली जाते. यावेळी साधू महंत वेगवेगळ्या आखाड्यातून मिरवणूक काढून येत नदीत शाही स्नान करतात. यावेळी साधु-महंतांना सर्व प्रथम शाही स्नान करण्याचा मान दिला जातो.
कधी होतो नाशिकमध्ये कुंभ?
सिंह राशिमध्ये जेव्हा गुरू येतो, त्यावेळी नाशिकचे सिंहस्थ कुंभस्नान होत असते. यंदा ३१ ऑक्टोबर २०२६ ला दुपारी १२.०२ वाजता सिंह राशिमध्ये गुरूचं आगमन होत आहे. त्यामुळे २०२७ च्या ऑगस्ट महिन्यामध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचे पहिले पर्वणी स्नान आहे. १९५६ साली याच पद्धतीचा त्रिखंड कुंभमेळा आला होता. त्यामुळे यंदाच्या कुंभमेळ्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. नाशिकला वैष्णवाचे स्नान होतात. तर त्र्यंबकेश्वरला शैव लोकांचे स्नान होते.
अशा आहेत अमृत स्नानाच्या तारखा
ध्वजारोहण
३१ ऑक्टोबर २०२६
समाप्ती
२४ जुलै २०२८
नगर प्रदक्षिणा
२९ जुलै २०२७
प्रथम अमृत स्नान
२ ऑगस्ट २०२७
द्वितीय अमृत स्नान
३१ ऑगस्ट २०२७
तृतीय अमृत स्नान
११ सप्टेंबर२०२७
ध्वज अवतरण पर्वकाळ
२४ जुलै २०२८











