राज्यराणीच्या प्रवाशांची गैरसोय होणार दूर, आसन आणि डब्यांच्या संख्येत मोठी वाढ

नाशिक : नांदेड ते मुंबई दरम्यान दररोज धावणाऱ्या राज्यराणी एक्सप्रेसच्या बोगी संख्येत वाढ करावी. अशी मागणीकित्येक दिवसांपासून जिल्हयातील मनमाड, लासलगांव, नाशिक, इगतपूरीतील प्रवाशांकडून केली जात होती. प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन खासदार राजाभाऊ वाजे यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरवठा सुरु केला असता प्रशासनाने याची दखल घेत राज्यराणी एक्सप्रेसला पाच वाढीव बोग्या लावण्यात येणार आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.

मुंबई दरम्यान दररोज हजारो प्रवाशी राज्यराणी एक्सप्रेसमधून प्रवास करतात.नाशिक, मनमाड, इगतपुरीसारख्या शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची सेवा ठरली आहे. मात्र, मर्यादित डबे आणि प्रचंड प्रवासी संख्खेमुळे प्रवाशांना दररोज प्रचंड गदचा सामना करावा लागतो. खासदार राजाभाऊ वाजे यांनी प्रवाशांच्या या त्रासदायक समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले आणि दक्षिण मध्य रेल्वे, भुसावळ विभाग तसेच रेल्वे मुख्यालयाशी सातत्यपूर्ण पत्रव्यवहार करत हा विषय प्रभावीपणे मांडला. रेल्वे प्रशासनाने डब्यांची संख्या वाढवावेत. अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली होती.

त्यानंतर वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक (डीसीएम) यांचे पत्र मंगळ्वारी (दि.14) आणि दक्षिण मध्य रेल्वेच्या चिफ कमर्शियल मॅनेजर (सीसीएम) यांच्या अहवालानुसार, प्रवाशांची वाढती संख्या, अस्वस्थता आणि प्रवासाच्या असुरक्षिततेचा मुद्दा लक्षात घेऊन राज्यराणी एक्सप्रेसच्या डबे रचना वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नाशिकसह जिल्हयातील हजारो प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे.

या निर्णयाला ॲडीशनल डिव्हिजन रेल्वे मॅनेजर (एडीआरएम) भुसावळ विभाग यांचीही मान्यता मिळालेली आहे. लवकरच सुधारित रचना कार्यान्वित होणार आहे. या महत्त्वपूर्ण यशामध्ये खासदार राजाभाऊ वाजे यांचा खंबीर पाठपुरावा, प्रवाशांच्या समस्या जाणून घेणारी संवेदनशीलता आणि वेळेवर रेल्वे प्रशासनाशी साधलेला संवाद यांचा मोठा वाटा आहे.

खासदार राजाभाऊ वाजे यांनी नाशिकच्या दैनंदिन प्रवाशांसाठी दिलेल्या या दिलासादायक निर्णयामुळे हजारो प्रवाशांना सुरक्षित, आरामदायक आणि सुलभ प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.


प्रस्तावित डबे रचना पुढीलप्रमाणे

-सेकंड सिटिंग (2 एस) डबे: 2 वरून 6
-जनरल कोच (जीएस) 4 वरून 7
-एकूण कोच संख्या: 17 वरून 22


तपोवन राज्यराणी पंचवटी या ट्रेन नाशिकच्या जीवनवाहिनी आहेत मात्र मागच्या काही दिवसात त्यांची अवस्था राजकीय अनास्थेमुळे अत्यंत दयनीय झाली आहे त्यांचं त्यांना पुनर्वैभव प्राप्त करून देणे यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून त्यासाठी माझा पाठपुरवठा सुरूच आहे. : राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक

error: Content is protected !!