Reservation : OBC समाजातील सात जणांनी आत्महत्या ; हैद्राबाद गॅझेटियर कारणीभूत

मुंबई | २ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आलेल्या हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीस मान्यता देणाऱ्या शासन निर्णयानंतर ओबीसी समाजातील सात जणांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये संधी गमावण्याची भीती या आत्महत्यांमागे असल्याचा दावा वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात केला आहे.

या निर्णयाविरोधातील याचिकांवर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी वकिलांकडून करण्यात आली होती. मात्र न्यायिक कारणांमुळे उच्च न्यायालयाने २९ सप्टेंबरला तातडीच्या सुनावणीस नकार दिला आहे. आता या प्रकरणाची सुनावणी ६ ऑक्टोबरनंतरच होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

error: Content is protected !!