रेल्वेतुन पडून पाच प्रवाश्यांचा मृत्यू

मुंबई । कसार्‍याच्या दिशेने जाणार्‍या फास्ट ट्रेन मधून पडून पाच प्रवाश्यांचा मृत्यू झाला. मुंब्रा च्या रेल्वे स्टेशनच्या फास्टट्रॅक जवळ प्रवासी ट्रेन मधून खाली पडल्याचे समजते ट्रेनमध्ये मोठी गर्दी होते. त्यामुळे प्रवासी जागा मिळविण्यासाठी धडपड करत होते. काही प्रवासी दारात लटकले होते.

यासंदर्भात अपघाताचा एक व्हीडीओ व्हायरल झाला असून यात प्रवासी रेल्वेतून खाली पडतांना दिसत आहेत. अनेकांनी गंभीर दुखापत झाली असल्याचे दिसत आहे. रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सदरच्या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर नऊ व्यक्तींना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे दाखल करण्यात आले आहे

हे प्रवासी नेमके कसे खाली पडले हे समजू शकले नाही. सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी कसारा ते सीएसटी या फास्ट ट्रॅक ट्रेन मधून दहा प्रवासी मुंब्राच्या रेल्वे स्टेशनच्या फास्टट्रॅक जवळ खाली पडल्याचे समजते.

आठ ते बारा प्रवासी पडल्याची प्राथमिक माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने देण्यात आलेली आहे. सोमवार असल्याने अधिक प्रमाणात लोकलमध्ये गर्दी असल्याने प्रवासी दरवाजावर लटकून प्रवास करत होते. अधिक गर्दी झाल्यामुळेच ही घटना घडली असल्याचा अंदाज पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!