मंत्री महाजन घेणार कुंभमेळा कामांचा आढावा

नाशिक । सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीला वेग देण्यासाठी गुरुवार, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन ध्वजारोहणानंतर महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत होणार्‍या या बैठकीचे अध्यक्षस्थान विभागीय महसूल आयुक्त व सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रविण गेडाम भूषवणार आहेत. मनपा अतिरिक्त आयुक्त नायर सचिव म्हणून सहभागी होणार असून, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभाग, मनपा, पोलिस, पर्यटन, वन आणि इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील.


बैठकीत रिंग रोडचे भूसंपादन व बांधकाम, त्र्यंबकेश्वर गोदावरी वॉटर ग्रिड योजना, घाट बांधकाम, अतिक्रमण हटवणे, पाणीपुरवठा योजना, नाशिक रोड रेल्वे स्टेशन व ओझर विमानतळ विकास, साधुग्राम भूसंपादन, आखाडा परिसर विकास, पर्यटन व देवस्थान प्रकल्प, तसेच शासकीय विश्रामगृहांची दुरुस्ती यांसारखे महत्त्वाचे मुद्दे चर्चिले जाणार आहेत.

याशिवाय, सिंहस्थ नियोजनात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, गर्दी व्यवस्थापन, वाहतूक व पार्किंग सोय, सुरक्षा, सीएसआर व पीपीपी संकल्पनेतून लोकसहभाग वाढवणे, भाविकांसाठी सुविधा, ब्रह्मगिरी परिसरात वृक्षारोपण व नदी संवर्धन यांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!