नाशिक । नाशिक हे हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक शहर म्हणून ओळखले जाते. शहराचा वाढता व्याप आणि विकसित होणारी पायाभूत सुविधा पाहता, येथे घरांची मागणी झपाट्याने वाढत आहे. मुंबई आणि पुण्याच्या मध्ये असलेले नाशिक हे गुंतवणूकदार, कामकाजी वर्ग आणि स्थायिक होऊ इच्छिणार्यांसाठी उत्तम पर्याय ठरत आहे.
गेल्या काही वर्षात घरांच्या मागणी वाढ झाल्याचे दिसून येते. यामागे अनेक सामाजिक, आर्थिक आणि भौगोलिक कारणे देखील आहेत यामध्ये नाशिक मुंबई आणि पुण्याच्या मध्ये असल्याने, येथून दोन्ही शहरांना सहज पोहोचता येते. त्यामुळे गुंतवणूकदार आणि कामकाजी वर्गासाठी हा उत्तम पर्याय ठरतो. नाशिक-मुंबई महामार्ग, समृद्धी महामार्ग, रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि एअरपोर्टमुळे नाशिकची पोहोच अधिक सोयीची झाली आहे.

सिन्नर, अंबड, सातपूरसारख्या औद्योगिक क्षेत्रांचा विस्तार, तसेच नवनवीन कंपन्यांची गुंतवणूक, यामुळे रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत आणि घरांची मागणी वाढली आहे. नाशिकमध्ये उच्च शिक्षणसंस्था, अभियांत्रिकी व मेडिकल कॉलेजेस, तसेच नामांकित हॉस्पिटल्समुळे स्थायिक होण्याची इच्छा वाढते. स्वच्छ हवा, कमी प्रदूषण, द्राक्षबागा, धार्मिक व पर्यटन स्थळं (त्र्यंबकेश्वर, सप्तश्रृंगी, पंचवटी) यामुळे निवासासाठी नाशिक आकर्षक ठरतो. मुंबई-पुण्याच्या तुलनेत इथे घरांचे दर अजूनही परवडणारे आहेत, आणि भविष्यात किंमत वाढण्याची शक्यता जास्त असल्याने गुंतवणूकदारांची रुची वाढली आहे.
नाशिकमधील घर घेण्यासाठी टॉप ५ परिसर
- गंगापूर रोड
मध्यवर्ती, उच्चभ्रू लोकांचा वावर असलेला परिसर
विमानतळ 27 किमी, रेल्वे स्थानक 16 किमी अंतरावर
सुला वाईन्स आणि पर्यटनस्थळांच्या जवळ - इंदिरा नगर
नाशिकच्या पश्चिम भागातील पॉश व विकसित परिसर
विमानतळ 25 किमी, रेल्वे स्थानक 8-9 किमी अंतरावर
सर्व आधुनिक सुविधांनी युक्त - पाथर्डी फाटा
मुंबई-आग्रा महामार्गालगत जलद गतीने विकसित होत असलेला भाग
विमानतळ 27 किमी, रेल्वे स्थानक 9 किमी अंतरावर
उद्योग, व्यवसाय आणि निवासी प्रकल्पांसाठी लोकप्रिय - गोविंद नगर
सुंदर, पॉश आणि उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी असलेला परिसर
विमानतळ 22 किमी, रेल्वे स्थानक 9 किमी अंतरावर
रहिवासी व व्यावसायिक प्रकल्पांसाठी योग्य - महात्मा नगर
नाशिकमधील सर्वात श्रीमंत आणि पॉश परिसर
विमानतळ 25 किमी, रेल्वे स्थानक 12 किमी अंतरावर
उच्चभ्रूंसाठी प्राधान्य असलेला रहिवासी भाग
याशिवाय मखमलाबाद रोड परिसरातही नव्या वसाहतींचा विस्तार होत असून, येथे सर्वसामान्यांना परवडणार्या दरात घरे उपलब्ध आहेत. नाशिक हे धार्मिक, पर्यटन आणि औद्योगिकदृष्ट्या वेगाने विकसित होत असल्याने, घर खरेदी किंवा गुंतवणुकीसाठी सध्याची वेळ उत्तम आहे.











