नाशिक । राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. यापूर्वी देखील मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेल्या भुजबळांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत चर्चा केली होती. मात्र आज भुजबळ एका वेगळया कारणासाठी फडणवीस यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत.
केंद्र सरकारच्या वतीने जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्यासह केंद्र सरकारचे आभार मानले. जातनिहाय जनगणना करण्याची राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची सन १९९२ सालापासून मागणी मागणी होती.या मागणीला मोदी सरकारच्या निर्णयामुळे यश मिळाले असून केंद्र सरकारच्या वतीने जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे.त्याबद्दल राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन केंद्र सरकारचे आभार मानले.










