नाशिक : क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित “फुले” हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यांच्या थोर कार्याचा आणि विचारांचा आधुनिक पिढीपर्यंत प्रभावीपणे प्रसार व्हावा, या उद्देशाने महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने या चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन करण्यात आले आहे.
या विशेष शोसाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महात्मा फुले जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अंबादास खैरे यांनी दिली आहे.
हा विशेष शो सोमवार, (दि. २८) रोजी दुपारी २ वाजता, सिटी सेंटर मॉल, उंटवाडी, नाशिक येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले असून, फुले दांपत्याच्या कार्याचा गौरव करण्यासाठी समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी या शोला उपस्थित राहावे असे आवाहनही समितीने केले आ
‘फुले’ चित्रपटाविषयी थोडक्यात :
“फुले” हा चित्रपट जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनावर आधारित आहे. १९व्या शतकातील सामाजिक स्थिती, अस्पृश्यता, स्त्रीशिक्षणाचा अभाव आणि जातीभेदाविरुद्ध लढा उभारणाऱ्या या थोर विभूतींच्या जीवनप्रवासाचे समर्पक चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे.
चित्रपटात जोतीराव आणि सावित्रीबाई यांचा शिक्षणासाठी केलेला संघर्ष, सत्यशोधक समाजाची स्थापना आणि समाजसुधारणेसाठी घेतलेली धडपड प्रभावीपणे दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना फुल्यांचे विचार आणि कार्य नव्या पिढीपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.











