‘शाही स्नान’ या शब्दाला साधू महंतांचा विरोध का? कुठून आला हा शब्द?

नाशिक । सिंहस्थ कुंभमेळयात होणाऱ्या पर्वण्यांना ‘शाही’ पर्वणी किंवा ‘शाही’ स्नान असे संबोधले जाते.पूर्वीपासून शाही स्नान हाच शब्द प्रचलित असल्याने प्रशासनही शाही स्नान किंवा शाही पर्वणी असा उल्लेख करत असत. परंतू आता आखाडा परिषदेने ‘शाही’ या शब्दालाच हरकत नोंदवत यापुढे कुंभमेळा पर्वण्यांना ‘शाही’ ऐवजी ‘अमृत’ स्नान असे संबोधले जावे असा ठराव केला. परंतू ‘शाही’ या शब्दाला विरोध का ? हा शब्द कुठून आला जाणून घेवूया….

‘शाही’ हा शब्द मुळात फारसी आहे, संस्कृत नाही. मुघल काळात याचा वापर वाढला. त्यामुळे शाही स्नान या परंपरेची सुरूवात आणि नावाचा उगम मुघल काळात झाला असे सांगितले जाते.

कुंभमेळयात ‘शाही स्नान’ ही संकल्पना मुघल काळात विकसित झाली. मुघल शासकांनी या धार्मिक परंपरेला राजकीय महत्व दिले. या काळात विविध आखाडयांच्या साधू-संतांना राजकीय संरक्षण दिले गेले असेही म्हणतात. यामुळेच आखाडयांच्या स्नानाला ‘शाही’ महत्व प्राप्त झाले.

‘शाही’ या शब्दाचा अर्थ राजाशी संबंधित किंवा राजेशाही असा होतो. मुघल काळात, राजेशाही थाटात होणार्‍या कोणत्याही गोष्टीला शाही म्हटले जात असे. कुंभमेळयातील आखाडयांच्या स्नानाला शाही म्हणण्यामागे त्यांची राजेशाही शान आणि महत्व आहे.

‘शाही’ स्नान हे कुंभमेळयातील सर्वात महत्वाचे धार्मिक विधी मानले जाते. या दिवशी आखाडयांचे साधू संत विशेष पध्दतीने गंगा नदीत स्नान करतात. लाखो भाविक या पवित्र स्नानाचे साक्षीदार होण्यासाठी जमतात.

‘शाही’ शब्दाचा वापर मुघल काळात वाढला, पण तो आजही अनेक ठिकाणी केला जातो. जसे की, शाही विवाह, शाही भोजन, शाही सवारी शाही स्नान हा शब्ंद मुघल काळात रूढ झाला, कारण या स्नानाला राजकीय आणि धार्मिक महत्व प्राप्त झाले होते.

परंतू नाशिक येथे आखाडा परिषदेने ‘शाही स्नान’ या शब्दाला विरोध करत यापुढे ‘अमृत स्नान’ असे संबोधित करावे असा ठराव केला. ‘शाही’ हा शब्द मुघल साम्राज्याशी संबधित असल्याने ‘शाही स्नान’ हा शब्दप्रयोग यापुढे करू नये असा ठराव यावेळी करण्यात आला.

कुंभमेळयाचे अमृत गोदावरीत पडले म्हणून ‘अमृत स्नान’ असे नाव यावेळी निश्चित करण्यात आले. प्रशासनानेही याची दखल घेत आता यापुढे कुंभ पर्वण्यांना आता ‘अमृत स्नान’ असे संबोधित करण्याबाबत आखाडा परिषदेने सूचित केले आहे.

error: Content is protected !!