हरिव्दारच्या बैठकीत आखाडा परिषदेने घेतला ‘हा’ निर्णय

नाशिक । नाशिक आणि उज्जैन येथे होणारया सिंहस्थ कुंभमेळयाच्या पार्श्वभूमीवर हरिव्दार येथे सर्व प्रमुख साधू महंतांची बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही कुंभमेळयाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या तयारी संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

नाशिक येथे होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून 16 हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. दर आठवड्याला सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बैठकीचा आयोजन केलं जातं मात्र प्रत्यक्षात कुंभमेळ्याच्या कामांना अद्याप सुरू सुरुवात झालेली नाही. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी कुंभमेळयासाठी कोणत्याही प्रकारे निधी कमी पडणार नाही त्याचप्रमाणे असुविधा होणार नाही असे आश्वासन दिले.

आखाडा परिषदेच्या वतीने शासनाकडे काही मागण्या मागण्या मांडण्यात आल्या आहेत यामध्ये साधूग्रामसाठी कायमस्वरूपी जागा संपादित करण्यात यावी या मागणीसह प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागण्यात आलेली आहे परंतु अद्याप पर्यंत मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली नसल्याने साधू महंतांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून नाशिक येथील काही प्रमुख साधू महंत हरिद्वार येथे गेले असून हरिद्वार येथे वैष्णव संप्रदायाच्या प्रमुख महंतांसोबत बैठक पार पडली. यावेळी निर्वाणी आखाड्याचे महंत मोहनदास महाराज, महंत राजेंद्रदास महाराज, खालसा परिषदेचे अध्यक्ष महंत माधवाचार्य महाराज, वैष्णव आखाड्याचे उज्जैन येथील प्रमुख महंत काशीदास महाराज, नाशिक येथील आखाडा परिषदेचे प्रवक्ता भक्तिचरणदास महाराज यावेळी उपस्थित होते. यावेळी उज्जैन आणि नाशिक येथील कुंभमेळ्याच्या तयारी संदर्भात सुरू असलेल्या कामांची चर्चा करण्यात आली

लवकरच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून आखाडा परिषदेच्या मागण्या मांडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे शासनाने देखील आखाडा परिषदेला लवकरात लवकर वेळ देऊन दोन्ही कुंभमेळ्यांच्या तारखा जाहीर करण्यासंदर्भात पत्र देण्याचे यावेळी निर्णय घेण्यात आला. आखाडा प्रमुखांनी कुंभमेळा तयारी संदर्भात वेळोवेळी आखाडा परिषदेच्या महंतांसोबत चर्चा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

error: Content is protected !!