मुंबई । सोमवारी जोरदार उसळल्यानंतर मंगळवारी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 1281 अंकांनी (1.55%) घसरून 81,148 वर, तर निफ्टी 50 निर्देशांक 346 अंकांनी (1.39%) घसरून 24,578 वर बंद झाला. यामुळे गुंतवणूकदारांचे जवळपास 1.28 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहेत.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धबंदी जाहीर करण्यात आली असली तरी ड्रोन हालचाली व शोपियानमधील चकमक यामुळे गुंतवणूकदारांमध्ये अजूनही अस्थिरता कायम आहे. शिवाय, अमेरिकन डाउ जोन्स फ्युचर्स किरकोळ घसरणीसह व्यवहार करत होते, ज्याचा भारतीय बाजारावरही प्रभाव झाला.
घसरणीचे मुख्य कारणे
कच्च्या तेलाच्या दरात वाढ
अमेरिकन डॉलर निर्देशांक (DXY) मध्ये मजबूती
जागतिक भू-राजकीय अनिश्चितता
सीमेवरील तणाव आणि दहशतवादी हालचालींच्या बातम्या
कोणत्या क्षेत्रांना फटका?
सगळ्यात मोठा फटका खालील क्षेत्रांना बसला:
आयटी (IT)
मेटल
एफएमसीजी (FMCG)
ऑईल अँड गॅस
या क्षेत्रांमध्ये घसरण
Infosys -3.58%
Power Grid Corp -3.43%
Eternal -3.28%
HCL Technologies -3.04%
TCS -2.91%
काही कंपन्यांनी सकारात्मक कामगिरी केली.
Bharat Electronics +4.01%
Hero MotoCorp +1.97%
Jio Financial +1.71%
Dr Reddy’s Labs +0.96%
Sun Pharma +0.82%
गुंतवणूकदारांसाठी काय अर्थ?
सोमवारी सेन्सेक्समध्ये जवळपास 3000 अंकांची उसळी झाली होती. भारत पाकिस्तान युद्धबंदीच्या घोषणेमुळे बाजारात सकारात्मक वातावरण होते. मात्र, एकाच दिवसात ही तेजी मंगळवारी घसरून गेल्याने बाजारातील अस्थिरता पुन्हा स्पष्ट झाली आहे. तज्ज्ञांचे मत आहे की, जागतिक घडामोडी, कमॉडिटी दर, आणि डॉलर निर्देशांकाकडे गुंतवणूकदारांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे. अल्पकालीन अस्थिरतेमध्ये गुंतवणूक धोरण ’थांबा आणि पाहा’ हे अधिक योग्य ठरेल.










