नाशिक : नाशिक शहर गुन्हेगारीमुक्त करण्याच्या दिशेने कठोर पावल उचलण्यात आली आहेत. मुख्यमंत्र्यांनीही या संदर्भात पोलिसांना कडक निर्देश दिले असुन, गुंड कोणत्याही पक्षाचा असो अगदी भाजपचा असला तरी हयगय केली जाणार नाही अशी ग्वाही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
नाशिक इथं भाजपच्या निवडणूक संचालन समितीच्या बैठकीच्या निमित्ताने उपस्थित झालेले गिरीश महाजन यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. नाशिक शहरात गुन्हेगारिने उच्छाद मांडला असून पोलीस आता ऍकॅशन मोडवर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून गुन्हे दाखल करण्यायासह गुन्हेगारांचे अड्डे उध्वस्त करण्यात येत आहे. या बाबत बोलताना महाजन म्हणाले, नाशिक आम्हाला गुन्हेगार मुक्त करायचे आहे याकरता आता कारवाई सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांनीही कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. लोकांच्या लाखो, करोडो लोकांच्या मालमत्तांवर कब्जा करायचा, घर बळकवायचे असे प्रकार वाढले आहेत, नागरिकांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे. मात्र आता पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले असून, आपण बघितले असेल की गुंड कोणत्याही पक्षाचा असो त्याच्यावर कारवाई करताना। हयगय केली जाणार असल्याची ग्वाही महाजन यांनी दिली
त्यांच्याबाबत पक्ष निर्णय घेईल
भाजपच्या माजी नगरसेवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे त्यांच्याबाबत पक्षा कडून काय भूमिका घेणार याबाबत विचारले असता महाजन म्हणाले, या संदर्भात निश्चित पक्ष स्तरावर कारवाई केली जाईल. परंतु गुंड कोणत्याही पक्षाचा असो सोडणार नाही असा पुनरुच्चार त्यांनी केला
शहरातील रस्ते होणार काँक्रीटचे
शहरातील खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले आहे. पाऊस आता थांबला आहे. त्यामुळं खड्डे बुजवण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. पुढील पाच सहा दिवसात नाशिक शहर खड्डेमुक्त होईल.परंतु हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आता शहरातील रस्ते काँक्रीटचे केले जाणार आहे, याकरीत 1200 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. आगामी काळात शहरातील रस्तेही कॉक्रीटीकरण होऊन शहर खड्डेमुक्त होईल असा विश्वास मंत्री महाजन यांनी व्यक्त केला.











