नाशिक | भारत पाकिस्तान भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर जोरदार भारताने युद्ध बंदीची युद्धविराम जरी घेतला असला तरी भारतीय सैन्य मात्र अलर्ट मोडवर आहे. त्याचप्रमाणे नागरिक संरक्षण दल तसेच जिल्हा प्रशासनालाही सतर्कतेचे आदेश देण्यात आलेले आहे.
त्यानुसार नाशिक मध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध ठिकाणी मॉक ड्रिल घेऊन नागरिकांना युद्धजन्य परिस्थितीचे प्रशिक्षण दिले जात आहे.
पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारताने मंगळवारी मध्यरात्री म्हणजे बुधवारी 7 मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ या लष्करी मोहिमेद्वारे पाकिस्तानातील नऊ दहशतवादी अट्टे उध्वस्त केल्यावर दोन्ही शेजारी देशात गेल्या तीन दिवस संघर्ष सुरू होता. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशांनी सशस्त्र कारवाई थांबवण्याच्या प्रस्तावाला शनिवारी मान्यता दिल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष व डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी सायंकाळी केली. दरम्यान संघर्ष विरामावर तात्काळ अंमलबजावणी करण्याचे उभय देशांनी मान्य केल्यानंतरही पाकिस्तानने अवघ्या काही तासातच या कराराचे उल्लंघन केले.
त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण आहे परंतु सध्या तरी युद्ध विराम झाला असून भारताने जशास तसे उत्तर देण्याचा इशाराही दिला आहे. दरम्यान या एकूणच पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर असून नाशिक जिल्हा प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे. याच पार्श्वभूमीवर शहरांमध्ये आज सायंकाळी 7 वाजता सायरन वाजवण्यात येणार आहेत हे सायरन केवळ प्रात्यक्षिकाच्या आणि सरावाचा भाग असल्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.








