नाशिक कुंभमेळयासाठी राज्य शासनाकडून ७ हजार कोटी रूपये मंजूर

नाशिक । नाशिकच्या साधुग्रामसाठी कायमस्वरूपी भूसंपादनाची मागणी विचारात घेत राज्य शासनाने भूसंपादनासाठी १ हजार ५० कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच रिंगरोडसाठी ३ हजार कोटी तर आठ रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी निधीला मान्यता देण्यात आली आहे. सिंहस्थ कुंभमेळयासाठी २५ हजार कोटी रूपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून यापैकी राज्य शासनाकडून आतापर्यंत ७ हजार कोटी रूपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे.

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाार्‍या कुंभमेळ्यास आता २१ महिन्यांचा कालावधी राहिला आहे. कुंभमेळ्यानिमित्त देशविदेशातील लाखो भाविक नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर येणार्‍या भाविकांना आवश्यक पायाभूत सोयीसुविधा उपलब्धतेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.

राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून कुंभमेळ्यासाठी पूर्वतयारी सुरू केली आहे. त्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्यात आले असून प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध विकास कामांना प्रशासकीय मंजुरी प्रदान करीत विकास कामे, पायाभूत सोयीसुविधांच्या कामांना चालना देण्यात येत आहे.


सर्व कामे कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याच्या संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. या कामांच्या माध्यमातून नाशिक- त्र्यंबकेश्वरच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि भाविकांसाठी सुविधा उभ्या करण्यावर भर देण्यात येत आहे, सर्व कामांचे प्रत्येक टप्प्यावर संनियंत्रण करण्यात येत असून त्याचा वेळोवेळी आढावा घेण्यात येत आहे.
डॉ. प्रवीण गेडाम, अध्यक्ष कुंभमेळा प्राधिकरण-


कुंभमेळा सुकर, सुलभ आणि पर्यावरण पूरक व्हावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू असलेले विविध प्रकल्प आता गती घेत आहेत. त्यामुळे कुंभमेळ्याच्या कामांना चालना मिळाली असून ते वेळेत पूर्ण होतील.
शेखर सिंह, आयुक्त कुंभमेळा प्राधिकरण-

या कामांना मंजूरी
त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र विकास २७५ कोटी
रामकाल पथ ४६ कोटी १४ लाख
रिंगरोड भूसंपादन ३६५९ कोटी
रस्ते विकास २२७० कोटी
विकास प्राधिकरणासाठी ५१४० कोटी
सीसीटीव्ही, रस्ते, पूल, ओएफसी केबल ३०१६ कोटी
त्र्यंबक नगरपालिका मलनिस्सारण प्रकल्प १६५ कोटी
वीज वितरण उपकेंद्र उभारणी ७३ कोटी ५० लाख
राज्य पुरातत्व विभाग ४८ कोटी ७८ लाख
साधुग्राम भूसंपादन १०५० कोटी
रेल्वे स्थानक विकास १४७६ कोटी
राष्ट्रीय महामार्ग २९४ किमी विकास ४७४९
ओझर विमानतळ विकास ६४० कोटी

error: Content is protected !!