Shivsena Nirdhar Shibir : खैरे, दानवे समोरासमोर अन पुढे काय घडले पाहा…

नाशिक । शिवसेनेत माजी खा.चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यातील गटबाजी जगजाहीर आहे. दोन दिवसांपूर्वीच या दोघा नेत्यांमध्ये पुन्हा एकदा वाद उफाळून आला होता. हा वाद मातोश्रीपर्यंत पोहचला. मात्र नाशिकच्या निर्धार शिबीरात दानवे आणि खैरे एकत्रितपणे दिसले. यावेळी खैरेंनी दानवेंचे भाषणही ऐकले. त्यामुळे या दोघांमध्ये मनोमिलन झाल्याची चर्चा होती.

ठाकरेंच्या शिवसेनेत माजी खासदार चंद्रकांत खैरे विरुद्ध विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात पुन्हा एकदा वात पेटलाय अंबादास दानवेंच्या मेळाव्याला खैरेंनी दांडी मारली त्यानंतर स्पष्टीकरण देताना त्यांनी दानवेवर बोचरी टीका केली शिवसेना मी वाढवली अंबादास नंतर आला तो काड्या करण्याच काम करतो हल्ली तो फार मोठा झाल्यासारखा वागतो अशा शब्दात खैरेंनी दानवेंचा समाचार घेतला. इतकेच नव्हे तर खैरेंनी थेट मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे दानवेंविषयी तक्रार केल्याचे समजते. नाशिकमध्ये बुधवारी आयोजीत मेळाव्यात दानवे, खैरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

मेळाव्याप्रसंगी अंबादास दानवे यांनी संघटनेचा आत्मा आणि पुनर्बांधणी या विषयावर शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. यावेळी चंद्रकांत खैरे यांनी व्यासपीठासमोर खुर्चीवर बसून दानवेंचे संपूर्ण भाषण ऐकले. मात्र संपूर्ण मेळाव्यात या दोघा नेत्यांनी एकमेकांशी बोलणे टाळल्याचे दिसून आले. परंतू उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर दोनही नेत्यांनी एकत्र येत मनोमिलन झाल्याचे संकेत दिले.

error: Content is protected !!