शनिवारी शहराचा पाणी पुरवठा राहणार बंद

नाशिक । स्मार्ट सिटी कंपनीमार्फत फ्लॉमिटर बसविण्याचे कामे प्रस्तावित असुन त्याचप्रमाणे नाशिक मनपा क्षेत्रातील शहरातील पाणी पुरवठा विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करावयाची असल्याने शनिवार (दि.२०) रोजी शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे तर रविवार (दि.२१) रोजी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल असे महापालिका पाणी पुरवठा विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

स्मार्ट सिटी कंपनीमार्फत हे काम करण्यात येणार असून यात नाशिक पूर्व प्रभाग क्रमांक १४ मधील कालिका जलकुंभ, पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक २३ मधील अशोका स्कूल समोरील ४०० मि.मी. व्यासाच्या वितरण वाहिनीवरील व्हॉल्व बसवणे.

गांधीनगर जलकुंभ, भीमनगर जलकुंभ, शिवशक्तीनगर जलकुंभ, पवारवाडी जलकुंभ, नविन नाशिक विभागातील भवानी माता जलकुंभ येथील पाईपलाईवर दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. याकरीता शनिवार (दि.२०) रोजी संपूर्ण दिवसभर शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे महापालिकेने कळवले आहे.

error: Content is protected !!