नाशिक : महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ अंतर्गत असलेल्या इंदिरा नगर कक्षाच्या ३३/११ केव्ही शिवाजीवाडी विद्युत उपकेंद्रअंतर्गत असलेल्या ग्राहकांना योग्य दाब तसेच अखंडित सेवेसाठी शिवाजीवाडी उपकेंद्र येथे जास्त क्षमतेचे रोहित्र बसविण्यात येणार असल्याने आज शनिवारी (दि.३१ मे) रोजी सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत विद्युत पुरवठा बंद असणार आहे.
यामध्ये भारत नगर, दिपाली नगर, शनी मंदिर, क्यूरी मानवता, कल्पतरू, बाबा नगर या ११ केव्ही विद्युत वाहिन्या आणि ३३ केव्ही अशोका हॉस्पिटल या वाहिन्यांवरील भागाचा वीज पुरवठा खंडित असणार आहे.
यामध्ये दिपाली नगर वाहिनीवरील दिपाली नगर, विनय नगर, गणपती नगर, काळे मळा, सुचिता नगर, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक, परब नगर, बापु बंगला, साईनाथ नगर, अशोका हॉस्पिटल रोड या भागाचा समावेश असणार आहे.
तसेच भारत नगर वाहिनीवरील भारत नगर, शिवाजीवाडी, रहनुमा नगर, ममता नगर, जयदीप नगर, चीस्तीया कॉलनी, खोडे नगर, रहेमत नगर, गणेश नगर, वडाळा गाव, मिल्लत नगर, अजमेरी कॉलनी व परिसर.
शनी मंदिर वाहिनीवरील शनी मंदिर, सुचिता नगर, आदर्श कॉलोनी, कमोद नगर, प्रसन्न कॉलोनी, गीतांजली कॉलनी व परिसर.
कल्पतरू नगर वाहिनीवरील अशोका मार्ग, मातोश्री कॉलनी, निसर्ग कॉलनी, खोडे नगर, गोदावरी नगर, पं. रविशंकर मार्ग, तसेच क्युरी मानवता हॉस्पिटल व अशोका हॉस्पिटल या या परिसराचा समावेश असणार आहे.







