मुंबई । राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर पुन्हा एकदा मोठ्या खांदेपालटीचे आदेश जारी केले असून आठ वरिष्ठ आयएएस अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांची ही मालिकाच सुरू असून यामध्ये पुणे, मुंबई, धुळे, अमरावतीसह इतर महत्त्वाच्या ठिकाणी अधिकार्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
पंतप्रधान कार्यालयात प्रतिनियुक्तीवर गेलेले वरिष्ठ आयएएस अधिकारी नवल किशोर राम यांची पुन्हा पुण्यात बदली करत त्यांच्याकडे पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर शितल तेली-उगळे यांच्याकडे पुण्यातील क्रीडा आणि युवा आयुक्तपद सोपवण्यात आले आहे.
धुळे जिल्हाधिकारी पदावरील जे.एस. पापळकर यांची बदली छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तपदी करण्यात आली असून, त्यांच्या जागी भाग्यश्री विसपुते यांची नियुक्ती झाली आहे. सी.के. डांगे यांच्याकडे आता मुख्य सचिव कार्यालयातील सहसचिवपद देण्यात आले आहे.
सौरभ कटियार यांची बदली बृहन्मुंबई जिल्हाधिकारी म्हणून झाली आहे, तर अमरावती जिल्हाधिकारीपदी आशिष येरेकर यांची नेमणूक झाली आहे. आनंद भंडारी यांची नियुक्ती अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झाली आहे.
नवल किशोर राम (IAS:RR:2008) – आयुक्त, पुणे महानगरपालिका
शीतल तेली-उगले (IAS:RR:2009) – क्रीडा आणि युवा आयुक्त, पुणे
जे.एस. पापळकर (IAS:SCS:2010) – विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजी नगर
सी.के. डांगे (IAS:SCS:2010) – सहसचिव, मुख्य सचिव कार्यालय, सामान्य प्रशासन विभाग
सौरभ कटियार (IAS:RR:2016) जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा
भाग्यश्री विसपुते (IAS:RR:2017) जिल्हाधिकारी, धुळे
आनंद भंडारी (IAS:NON-SCS:2017) मुख्य कार्यकारी अधिकारी, अहिल्यानगर जिल्हा परिषद
आशिष येरेकर (IAS:RR:2018) जिल्हाधिकारी, अमरावती










