विमान दुर्घटना ; टाटा ग्रुपकडून मदतीचा हात

मुंबई । अहमदाबादजवळील एअर इंडिया फ्लाइट 171 या विमानाच्या अपघातात 241 प्रवाशांचा मृत्यू झाला असून एकमेव प्रवासी बचावला आहे. ही अत्यंत दुःखद आणि गंभीर घटना देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रवाशांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

ही फ्लाइट बोईंग कंपनीची असून टाटा ग्रुपच्या ताफ्यातील होती. टाटा ग्रुपने नैतिक जबाबदारी स्वीकारून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींच्या उपचाराचा खर्चही टाटा ग्रुप उचलणार असून आवश्यक ती सर्व मदत केली जाणार आहे. अपघातात कोसळलेल्या बी.जे. मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाची नव्याने उभारणी करण्याचे आश्वासनही टाटा ग्रुपने दिले आहे.

टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी या दुर्घटनेविषयी दुःख व्यक्त करत एक पत्रक जारी केले. त्यांनी सांगितले की, “या अपघातामुळे आमच्या भावना व्यथित झाल्या आहेत. आम्ही सर्व कुटुंबीयांसोबत आहोत.” दुर्घटनाग्रस्त विमान बोईंग कंपनीचे असल्याने तपासासाठी बोईंगची तज्ज्ञ टीम भारतात येणार आहे. या तपासात जीई एरोस्पेस कंपनीही सहभागी होणार आहे.

विशेष म्हणजे, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हेही या विमानात प्रवास करत होते. त्यांचाही या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

ब्रिटीश नागरीकांसह ११ लहान मुले
या विमानातून २४२ प्रवासी प्रवास करत होते. त्यामध्ये २३० प्रवासी आणि १२ क्रु मेंबर होते. यात १६९ भारतीय प्रवासी ५३ ब्रिटीश नागरिक, पोर्तुगालचे ७ आणि कॅनडाचा एक नागरिक प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेनंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनीही व्टिट करत शोक व्यक्त केला आहे. १२ क्रु मेंबर्सपैकी १ क्रू मेंबर महाराष्ट्राची नागरिक होती असे समजते.

error: Content is protected !!