भारतात दरवर्षी किती प्रवासी करतात विमान प्रवास ? किती आहेत विमानतळ ?

मुंबई । एअर इंडियाच्या विमानाला अहमदाबाद येथे अपघात झाल्यानंतर विमान प्रवासाबाबत प्रवाश्यांमध्ये असुरक्षिततेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अपघातामुळे विमान प्रवाश्यांची संख्या घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आज भारत देशांतर्गत हवाई प्रवासी संख्येत तिसर्‍या क्रमांकावर आहे. केंद्राने उडाण योजना लागू केल्यानंतर देशांतर्गत प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली आहे.

भारतीय विमान उद्योगाचे मुल्यांकन १६ अब्ज अमेरिकी डॉलर आहे. देशात ४८७ विमानतळे असून आजघडीला एकूण ८०० विमाने आहेत. २०१४ पूर्वी देशात ७४ विमानतळे होती आज ती १६२ पर्यंत विस्तार करण्यात आला आहे. भारतात देशांतर्गत विमानप्रवासी संख्या २०१४ मध्ये ७ कोटी होती. ती २०२० मध्ये १४.३ कोटी इतकी झाली आज १६.५० कोटी प्रवासी संख्या झाली. आंतरराष्ट्रीय प्रवासी संख्येतही ५० टक्क्यांनी वाढ झाली. भारतात सध्या १६.५० कोटी इतके प्रवासी विमान प्रवास करतात. ही संख्या २०३० पर्यंत दुप्पट हाईल, असे आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेने अंदाज वर्तवला आहे. सध्या अमेरिका आणि चीननंतर देशांतर्गत हवाई प्रवासी संख्योत भारत हा जगातील तिसरया क्रमांकावर आहे.

सन २०१४ मध्ये भारतात ७४ विमानतळ होते. ती संख्या आता १६२ इतकी झाली. पुढील पाच वर्षांत २०० पर्यंत भर पडेल असा अंदाज आहे. गेल्या दहा वर्षात भारतातील विमानांची संख्या ४०० वरून ८०० च्या घरात गेली आहे. चीनमध्ये आजही तुलनेत ४५०० विमाने कार्यरत आहेत. २०२७ पर्यंत विमानसंख्या ३५०० पर्यंत जाईल असा अंदाज आहे.

अयोध्या, अंदमान, लेह, श्रीनगर ते मुंबई, पुणे, नाशिक अशा विविध ठिकाणी हवाई प्रवासी उपलब्धता गेल्या काही वर्षात लक्षणीयरित्या वाढली आहे. कोरोनानंतर गेल्या दोन ते अडीच वर्षात पर्यटनाला बहर आला आहे. त्याला तीर्थस्थळ पर्यटनाचा नवा आयामही मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर देशभर हवाई वाहतूक उद्योगाने देशभर पंख पसरले असून प्रवासी संख्या आणि महसूलातही झेप घेतली आहे.

error: Content is protected !!