नोकरीच्या शोधात आहात ? मग ही बातमी तुमच्यासाठी

मुंबई । नोकरीच्या शोधात असलेल्या दहावी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून (MCGM्) सुवर्णसंधी जाहीर करण्यात आली आहे. महानगरपालिकेने कार्यक्रम समन्वयक, आहारतज्ञ, कार्यकारी सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर आणि एनसीडी कॉर्नर्स एमपीडब्ल्यू या विविध पदांसाठी एकूण 115 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 19 मे 2025 आहे.

उपलब्ध पदे
कार्यक्रम समन्वयक – 24 पदे
आहारतज्ञ – 33 पदे
कार्यकारी सहाय्यक – 2 पदे
डेटा एंट्री ऑपरेटर – 30 पदे
एनसीडी कॉर्नर्स एमपीडब्ल्यू – 26 पदे

शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा

कार्यक्रम समन्वयक – एमबीबीएस/बीएचएमएस/बीडीएस किंवा समकक्ष वैद्यकीय पदवी
आहारतज्ञ – बी.एस्सी. न्यूट्रिशन + पी.जी. डिप्लोमा/एमएस्सी
कार्यकारी सहाय्यक/डीईओ – कोणत्याही शाखेतील पदवी
एमपीडब्ल्यू – किमान दहावी उत्तीर्ण (मराठी विषयासह)
वयोमर्यादा 35 ते 45 वर्षांच्या दरम्यान पदानुसार बदलते.

वेतनश्रेणी:
कार्यक्रम समन्वयक – 40,000 प्रतिमाह
आहारतज्ञ व कार्यकारी सहाय्यक – 30,000 प्रतिमाह
डेटा एंट्री ऑपरेटर – 18,000 प्रतिमाह
एनसीडी एमपीडब्ल्यू – 17,000 प्रतिमाह

अर्ज प्रक्रिया:
अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने करता येईल.
अधिकृत वेबसाईट: mcgm.gov.in
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 19 मे 2025
उमेदवारांनी संपूर्ण अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.

error: Content is protected !!