तरूणांनो तयारीला लागा ! या बँकेत लवकरच मोठी भरती

मुंबई । बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची तयारी करणार्‍या उमेदवारांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. बँक ऑफ बडोदाने लोकल बँक ऑफिसर पदासाठी भरती जाहीर केली असून, देशभरात एकूण २५०० पदांवर ही भरती होणार आहे. त्यापैकी महाराष्ट्रासाठी ४८५ जागा उपलब्ध असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २४ जुलै २०२५ पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे.

महाराष्ट्रातील आरक्षणानुसार पदवाटप
खुला प्रवर्ग – १९९ जागा
ओबीसी – १३० जागा
ईडब्ल्यूएस – ४८ जागा
एससी (अनुसूचित जाती) – ७२ जागा
एसटी (अनुसूचित जमाती) – ३६ जागा

अर्ज करण्याची पात्रता
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर
सीए, कॉस्ट अकाऊंटंट, इंजिनिअरिंग, वैद्यकीय पदवीधारक यांनाही संधी.
वयोमर्यादा २१ ते ३० दरम्यान
ज्या राज्यातून अर्ज करणार त्या राज्यभाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक.
उमेदवाराला संबधित भाषा लिहीता, बोलता आणि वाचता येणे गरजेचे.

वय: २१ ते ३० वर्षांदरम्यान.
कामाचा अनुभव: RBI च्या यादीतील शेड्यूल्ड कमर्शियल बँक किंवा प्रादेशिक ग्रामीण बँकेत किमान १ वर्षाचा अनुभव आवश्यक.

भाषेचं ज्ञान: अर्ज करत असलेल्या राज्यातील स्थानिक भाषा येणं आवश्यक – वाचन, लेखन, संभाषण आणि समजून घेणे.

शैक्षणिक पुरावा: दहावी व बारावीच्या गुणपत्रकांवरून भाषेचा अभ्यास झाल्याचा पुरावा आवश्यक.

CIBIL स्कोअर: कर्ज असल्यास ६८० पेक्षा जास्त स्कोअर आवश्यक.

अर्ज शुल्क
खुला, ईडब्ल्यूएस, ओबीसी प्रवर्ग – रू.८५०
एससी, एसटी, दिव्यांग, माजी सैनिक, महिला – रू.१७५

निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड चार टप्प्यांतून होणार आहे:
ऑनलाईन परीक्षा
सायकोमेट्रिक चाचणी
गट चर्चा (Group Discussion)
मुलाखत (Interview)
ऑनलाईन परीक्षेत पुढील घटकांचा समावेश असेल
इंग्रजी भाषा
बँकिंग व आर्थिक ज्ञान
सामान्य व आर्थिक बुद्धिमत्ता
रिझनिंग अ‍ॅबिलिटी
क्वांटिटेटिव अ‍ॅप्टिट्यूड

निवडीनंतर नियुक्ती व वेतन
निवड झालेल्या उमेदवारांना पहिली १२ वर्षे नियुक्त राज्यातच काम करावं लागेल (किंवा प्रमोशनपर्यंत).

प्रारंभीचं वेतन ४८,४८० ते ८५,९२० रू. दरम्यान.
प्रोबेशन कालावधी: १ वर्ष.

error: Content is protected !!