नाशिक । राज्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होउ नये याकरीता १२ वीच्या विद्यार्थ्यांना परिक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. नाशिक येथे बोलतांना शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी ही माहिती दिली.
राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधाार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हयांत पाऊस आणि महापुराने सर्वसामान्यांचे जगणे उध्दवस्त केले. शेती पिके, घरेदारे, पशुधन सगळे काही वाहून गेले आहे. शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य वाहून गेले आहे.
यावेळी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन येउन गेला.त्यानूसार १२ वी च्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढवली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नूकसान होउ नये याकरीता हा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा इमारत नुकसानीबाबत अहवाल आल्यानंतर निर्णय घेतला जाईल असेही ते म्हणाले.
राज्य सरकारने पूरग्रस्त विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाउ नये यासाठी १२ वी चे अर्ज भरायला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे १२ वीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.










