Maharashtra Board : दहावी, बारावी परिक्षा तारखा जाहीर

पुणे । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून तर दहावीची परिक्षा २० फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

बारावीची लेखी परिक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे. तसेच प्रात्याक्षिक, श्रेणी, तोंडी अंतर्गत मुल्यमापन परिक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. त्यात माहिती तंत्रज्ञान, सामान्य ज्ञान या विषयांच्या प्रात्याक्षिक परीक्षांचाही समावेश आहे. तर २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत दहावीची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. प्रात्याक्षिक श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २ फेब्रुवार ते १८ फेेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.

शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या उददेशाने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी मार्च २०२५ च्या परिक्षेच्या प्रात्याक्षिक, लेखी परीक्षांच्या ताराखा जाहीर करण्यात आल्या आहेत. परीक्षांचे विषयनिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

error: Content is protected !!