काठे गल्ली मार्ग तीन दिवसांनी खुला ; व्यावसायिकांच मात्र इतके नुकसान

नाशिक – काठे गल्ली परिसरातील रस्ता तब्बल तीन दिवसांनंतर अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. नाशिक पोलिसांनी आज (शनिवार) रस्त्यावरील बॅरिकेट्स हटवले असून, परिसरातील वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. मात्र गेल्या तीन ते चार दिवसांपासून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे तसेच या भागातील व्यवहारही ठप्प असल्यामुळे व्यवसायिकांच्या सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांच्या नुकसान झाल्याचे सांगितले जाते

नाशिक महापालिकेने काही दिवसांपूर्वी काठे गल्ली परिसरात असलेली अनधिकृत दर्गा हटवली होती. या कारवाईनंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता.

त्यानंतर शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नसल्याने आणि परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पाहून पोलिसांनी रस्ता खुला करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता आणि सामंजस्याचे वातावरण असून, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा कायम ठेवण्यात आला आहे.

error: Content is protected !!