नाशिक | वाढत्या तापमानामुळे नाशिक शहरातील नागरिकांना उष्णतेचा तीव्र फटका बसत आहे. शहरातील तापमान 40° अंशांवर पोहोचले असून, दुपारच्या वेळी उष्माघाताचा धोका वाढला आहे.
ही स्थिती लक्षात घेता, नाशिक पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला असून, शहरातील जवळपास 30 ट्रॅफिक सिग्नल दुपारी 1 ते 4 या वेळेत तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सिग्नलवर ताटकळत थांबल्याने लोकांना बसत असलेल्या उष्णतेच्या झळा टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाअंतर्गत, काही प्रमुख चौकांतील सिग्नल ब्लिंक मोडवर ठेवण्यात येणार आहेत, जेणेकरून वाहतूक सुरळीत राहील आणि नागरिकांना थांबावे लागणार नाही.
नाशिक पोलिसांनी नागरिकांना गरजेचे असेल तेव्हाच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले असून, उन्हापासून बचावासाठी योग्य ती काळजी घेण्यास सांगितले आहे.
उष्णतेपासून वाचण्यासाठी काही उपाय:
शक्यतो दुपारी घराबाहेर पडणे टाळा
भरपूर पाणी प्या
हलके, सुती कपडे वापरा
डोक्यावर टोपी, छत्री किंवा गॉगल वापरा
नाशिककरांनो, उष्णतेपासून स्वतःचा बचाव करा आणि सुरक्षित राहा!
हे सिग्नल राहणार पूर्णतः बंद
पेठ नाका
काट्या मारुती
मालेगाव स्टॅन्ड
तारवाला नगर
नांदूर नाका
मिरची ढाबा
स्वामीनारायण चौक
आरटीओ कॉर्नर
कृषी उत्पन्न
बाजार समिती
खडकाळी सिग्नल
मोडक सिग्नल
कॉलेज रोड
पारिजात नगर
जलतरण तलाव
जेहान सर्कल
वडाळा नाका
एचडीएफसी सिग्नल
सांगली बँक
बारदान फाटा
अशोका मार्ग
कॅनडा कॉर्नर सिग्नल
त्रिमूर्ती चौक
हे सिग्नल ब्लिंक मोडवर
एबीपी सर्कल
शरणपूर सिग्नल
सिटी सेंटर मॉल
जुना गंगापूर नाका
सीबीएस
गडकरी चौक
द्वारका चौक
पाथर्डी फाटा










