सिडनी (ऑस्ट्रेलिया) – उच्च शिक्षणासाठी सर्वोत्तम देशांमध्ये ऑस्ट्रेलियाचा नेहमीच समावेश होतो. हजारोंच्या संख्येने भारतीय विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. शिक्षणाचा खर्च मोठा असल्याने अनेक विद्यापीठे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची (स्कॉलरशिप) सुविधा देतात. अशाच एक नामांकित विद्यापीठाने भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.
सिडनी येथील मॅक्वेरी विद्यापीठाने ‘अर्ली अॅक्सेप्टन्स स्कॉलरशिप’ जाहीर केली असून, त्याअंतर्गत भारतीय विद्यार्थ्यांना एकूण 40,000 ऑस्ट्रेलियन डॉलर्स (सुमारे 21.5 लाख रुपये) इतकी आर्थिक मदत मिळू शकते. ही स्कॉलरशिप 2025 आणि 2026 मध्ये अंडरग्रॅज्युएट (UG) किंवा पोस्टग्रॅज्युएट (PG) कोर्ससाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे.
स्कॉलरशिपची वैशिष्ट्ये :
दरवर्षी 10,000 ऑस्ट्रेलियन डॉलर्स इतकी शिष्यवृत्ती दिली जाईल.
सिडनी कॅम्पसवरील सर्व कोर्सवर्क डिग्री प्रोग्रामसाठी ही स्कॉलरशिप लागू आहे.
चार वर्षांच्या UG कोर्ससाठी एकूण 40,000 डॉलर्सपर्यंत लाभ मिळू शकतो.
स्कॉलरशिपसाठी वेगळी अर्ज प्रक्रिया नाही – UG किंवा PG डिग्रीसाठी अर्ज केल्यानंतर पात्र विद्यार्थ्यांचा स्कॉलरशिपसाठी आपोआप विचार केला जाईल.
स्कॉलरशिप मिळण्यासाठी आवश्यक अटी :
अर्जदार हा भारताचा नागरिक असावा.
विद्यार्थ्याने मॅक्वेरी विद्यापीठात फुल-टाईम UG किंवा PG डिग्री कोर्समध्ये प्रवेश घेतलेला असावा.
विद्यापीठाकडून मिळालेल्या ऑफर लेटरला स्वीकार द्यावा आणि वेळेत फी भरावी.
प्रत्येक सेमेस्टरमध्ये प्रवेश आवश्यक आहे.
अशा सरकारी स्कॉलरशिपचा लाभ घेत नसावा, ज्या संपूर्ण ट्युशन फी कव्हर करतात. जर घेत असेल, तर मॅक्वेरी स्कॉलरशिप टीमकडून परवानगी आवश्यक आहे.
मॅक्वेरी विद्यापीठातील लोकप्रिय कोर्सेस :
बँकिंग आणि फायनान्स
डेटा सायन्स
माहिती तंत्रज्ञान (IT)
अभियांत्रिकी
बिझनेस अॅनालिटिक्स
मेडिसिन
आर्ट्स आणि मीडिया
कम्युनिकेशन
अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी मॅक्वेरी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.











