नाशिककरांनो आता खड्डा शोधून दाखवा

नाशिक | शहरातील रस्त्यांना पडलेले खड्डे बुजवण्यासाठी मी स्वतः रस्त्यावर उतरणार असल्याची ग्वाही मंत्री गिरीश महाजन यांनी दिली त्यानुसार आज महाजन यांनी नाशिकमध्ये रस्ते कामांची पाहणी केली.

नाशिक शहरातील रस्त्यांवर पावसामुळे अनेक खड्डे पडले होते. शहरातील अनेक रस्त्यांची दूरदर्शा झालेली होती. याबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक महानगरपालिका यांना सुचित करून खड्डे बुजविण्या बाबत निर्देश दिले होते. तसेच रस्त्यांच्या कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याचे देखील सूचना केल्या होत्या.

गेल्या अनेक महिन्यांपासून नाशिककरांना खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे शहरातील विविध भागातील रस्ते खड्डयात हरवले आहेत. वाहन चालवताना तर रस्ता शोधावा लागतो अशी परिस्थिती सध्या शहरात दिसत आहे. विविध राजकीय पक्ष संघटना नागरिकांनी खड्ड्या विरोधात आंदोलन करूनही प्रशासनाकडून मात्र कोणतीही पावलं उचलण्यात आली नाही. मंत्री गिरीश महाजन यांनी दोन दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये येत महापालिकेत बैठक घेत तातडीने खड्डे बुजवण्याचे आदेश दिले होते.

शनिवारी मंत्री गिरीश महाजन नाशिक येथे आले असता त्यांनी पेठ रोडवरील खड्डे बुजवण्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी आमदार राहुल ढिकले, महापालिका आयुक्त श्रीमती मनीषा खत्री, यांच्यासह प्रशासकीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

शहरातील सर्वच रस्ते येत्या आठवड्याभराच्या कालावधीत सुरळीत होतील यासाठी महानगरपालिकेने त्वरित उपाययोजना कराव्यात असे निर्देश त्यांनी यावेळी महापालिका आयुक्त यांना दिलेत. नाशिक शहरातील रस्त्यांबाबत कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी तसेच व्हाईट टॉपिंग करण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले .

error: Content is protected !!