त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर गुंडांकडून हल्ला

नाशिक । त्र्यंबकेश्वर येथे वृत्तांकनासाठी जात असतांना स्वामी समर्थ केंद्राजवळ असलेल्या पार्किंग जवळील गुंडांनी पत्रकारांना जबर मारहाण केली. या घटनेत इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे तीन पत्रकार जखमी झाले आहे. जखमींना अपोलो रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून या घटनेचा पत्रकारांनी जाहीर निषेध व्यक्त करत गुंडांवर कारवाईची मागणी केली आहे.

पत्रकार किरण ताजणे, अभिजीत सोनवणे, तासचे योगेश खरे हे वृत्तांकनासाठी जात असतांना काही गुंडांकडून त्यांना जबर मारहाण करण्यात आली. या घटनेत पत्रकार किरण ताजणे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारार्थ नाशिक येथील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

याप्रकरणी संबधितांवर कठोर कारवाई करावी असे निर्देश देण्यात आले असून अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांनी नाशिकमध्ये दाखल होत थेट रूग्णालयाच्या दिशेने ते रवाना झाले आहेत तर मंत्री गिरीश महाजन हे रात्री नाशिकमध्ये दाखल होणार असून जखमींची ते भेट घेणार आहेत.

error: Content is protected !!