नाशिक । छावा क्रांतिवीर सेनेचे ११वे राष्ट्रीय महाअधिवेशन दिनांक ११ मे रोजी पंढरपूर येथे संस्थापक अध्यक्ष करण पंढरीनाथ गायकर यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणार आहे.या अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठीची बैठक नाशिक शहरातील ग्रामदैवत श्री कालिका माता मंदिर येथील सभागृहात आज उत्साहात पार पडली.
या अधिवेशनाचे उद्घाटक नामदार भरत गोगावले,तर अध्यक्षस्थान उच्च व तंत्र शिक्षणमंत्री नामदार चंद्रकांत पाटील भूषविणार आहेत. कामगार नेते अभिजीत राणे, शेतकरी नेते रविकांत तुपकर, शिवसेना उपनेते सुनील बागुल,आरपीआय नेते प्रकाश लोंढे,जन स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार, गंगाधर काळकुटे व इतर मान्यवर राज्यातील खासदार,आमदार व विविध संघटनांचे अध्यक्ष यांची उपस्थिती राहणार आहे.
नाशिक जिल्ह्यातून शेकडो वाहनांद्वारे हजारो पदाधिकारी पंढरपूर अधिवेशनासाठी रवाना होणार असून,त्यासाठी सूक्ष्म नियोजन करणार्या समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.अधिवेशनासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींचे काटेकोर नियोजन पूर्ण करण्यात आले आहे.
या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षण,शेतकर्यांची कर्जमाफी, शासकीय शाळांचे डिजिटायझेशन,बंद होणार्या शाळांचे संरक्षण,सहकार क्षेत्रातील कारखाने,बँका,दूध संघांचे पुनरुज्जीवन,महिलांसाठी सक्षम धोरण,तसेच वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर कायदे व अंमलबजावणी आदी विषयांवर सखोल चर्चा व निर्णय घेण्यात येणार आहेत.याच अधिवेशनात आगामी वर्षभराचे संघटनात्मक कार्य व दिशा निश्चित केली जाणार आहे.
या बैठकीस शिवाजी मोरे,शिवा तेलंग,विजय वाहुळे,नवनाथ शिंदे,डॉ.किरण डोखे,आशिष हिरे,नवनाथ वैराळ,संगीता सूर्यवंशी,प्रवीण पाटील,दिनेश जाधव,गोरख संत,भारत पिंगळे,आबा पाटील,योगेश गांगुर्डे,ज्ञानेश्वर पालखेडे,सागर जाधव, किरण लवंड,सोमनाथ पवार,कणसे बाबा,प्रफुल गायकवाड,तेजस नवले,शुभम महाले,योगेश आहिरे,सुदर्शन हिरे,डॉ राकेश देवरे,संदीप हिरे,संदीप मोरे,अभिषेक गुंजाळ,मनोज वाघ,विशाल घागस,सागर गाडे,अमोल देवरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाशिक जिल्हा प्रमुख आशिष नाना हिरे यांनी केले,आभार प्रदर्शन ग्रामीण जिल्हाप्रमुख नवनाथ वैराळ यांनी केले,तर सूत्रसंचालन नाशिक महानगर प्रमुख योगेश गांगुर्डे यांनी केले.











