मुंबई : पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबिया चा दौरा अर्धवट सोडून भारतात परतले आहेत तर दुसरीकडे गृहमंत्री अमित शहा काश्मीरमध्ये तळ ठोकून आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली आहे आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.
दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याचे पडसाद देशभर उमटत आहेत. देशभरातून संतापाची लाट देखील याविषयी व्यक्त होत आहे ठीक ठिकाणी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज आंदोलन देखील होणार आहेत.
या सर्व घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय पाऊल उचलतात याकडे संपूर्ण देशाचा लक्ष लागला आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाचा देखील पाठिंबा देशाला मिळत आहे ज्यावेळेस अतिरेक्यांनी हल्ला केला त्यावेळेस अमेरिकेचे उपराष्ट्र अध्यक्ष भारतात होते पंतप्रधान सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते त्यामुळे इतर देशांपुढे भारत कमकुवत आहे का असं दाखवण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी केला का याविषयी देखील आता शंका उपस्थित केली जात आहे .
त्यामुळे दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. अनेक राजकीय पक्षांनी देखील सरकारने ठोस कारवाई करावी यासाठी पक्षाचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले. त्यामुळे सर्जिकल स्ट्राइक सारखा पुन्हा एकदा भारत आक्रमक भूमिका घेणार का?याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.











