अजित पवारांनंतर आता शिंदे गटाच्या मंत्र्यांचा जमीन घोटाळा , कोण आहे हा मंत्री ?

मुंबई । राज्यात सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा जमीन खरेदी प्रकरण चांगलेच गाजत आहे. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून प्रकरणाच्या चौकशीसाठी समितीही गठित करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे अजित पवार चर्चेत आले असतांनाच विजय वडेट्टीवार यांनी अजून एक बॉम्ब टाकला आहे. मुंबईत शिंदे सेनेच्या एका मंत्र्यांने मोठा जमीन घोटाळा केल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.

मुंबईत शिंदे सेनेच्या एका मंत्र्यांने मोठा जमीन घोटाळा केल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. मिरा भाईंदरमध्ये 200 कोटींची जमीन मंत्रिमहोदयांनी अवघ्या 3 कोटीत लाटल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. त्यांच्या ताज्या आरोपाने सरकारच्या अडचणी वाढताना दिसत आहे. पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणी समिती गठीत करणे, अहवाल मागवणे अशी रुटीन प्रक्रिया करण्यात येत आहे. पण खमकी कारवाई करण्याचा कोणताही इरादा सरकारने अद्याप दाखवलेला नाही.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर जमीन घोटाळा केल्याच्या आरोप केला आहे.ज्या जमिनीवर प्रताप सरनाईक यांच्यावर घोटाला केल्याचा आरोप आहे ती जमीन मीरा भाईंदरमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. या जमिनीचा बाजारभाव 200 कोटी रुपये असून ती अवघ्या 3 कोटी रुपयांत सरनाईकांनी मिळवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

error: Content is protected !!