नाशिक | महसुल विभागाच्या वतीने सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आल आहे. या अभियानाच् उद्घाटन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज नाशिक इथे करण्यात आलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महसूल विभागाच्या वतीने सेवा पंधरवडा राबवण्यात येत आहे. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधी जयंती पर्यंत हा पंधरवडा राबवण्यात येणार असून या पंधरवड्या निमित्त रस्ते त्याचप्रमाणे आरोग्य सुविधा सर्वांसाठी घरे आणि महसूल विषयक कामकाज गतिमान होण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.
आज नाशिक इथं या सेवा पंधरवड्याचं उद्घाटन करण्यात आल. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, आमदार देवयानी फरांदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री महाजन म्हणाले की, गेल्या अकरा वर्षांपासून नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहे परंतु ते नेहमी आपला वाढदिवस हा सेवा पंधरवडा म्हणून साजरा करतात आज राज्यासह देशात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वामध्ये विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत.
लाडकी बहीण योजना सर्वांसाठी, आरोग्य योजना सर्वांसाठी घरे, सौर ऊर्जा प्रकल्प असे विविध कल्याणकारी उपक्रम राबविले जात आहेत
यावेळी विरोधकांवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, यापूर्वी केवळ गरिबी हटावचा नारा दिला गेला परंतु गरीबी काही हटली नाही परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये गरीब कल्याणाचे कार्यक्रम राबवण्यात येत आहे. 2027 पर्यंत सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
आज जगामध्ये भारताचा दबदबा वाढला आहे. मी गेली 35 वर्षे आमदार आहे भाजपामध्ये मी सर्वात सिनियर आहे. कधीही परदेशात गेलो की भारताकडे गरीब देश म्हणून बघितले जात होतं परंतु आता जगाने नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मान्य केले आहे. जगात भारताचा दबदबा वाढत आहे. आपली अर्थव्यवस्था ही आठव्या क्रमांकावरून आता पाचव्या क्रमांकावर आली आहे आणि आता ती तिसऱ्या क्रमांकावर नेण्याच्या दृष्टीने आपण प्रगती करत असल्याचं ते म्हणाले.
लाडकी बहीण योजनेवरूनही त्यांनी विरोधकांना चांगले सुनावले, गेल्या वर्षभरापासून लाडकी बहिण योजनेतून महिलांना लाभ दिला जातोय परंतु यामुळे आमच्या काही सावत्र भावांच्या पोटात दुखायला लागले आहे. जिल्हा परिषद महानगरपालिका निवडणुका झाल्या की ही योजना बंद होणार अशा प्रकारचा अपप्रचार केला जातोय परंतु ही योजना बंद होणार नाही असेआश्वासन देखील त्यांनी यावेळी दिलं










