जातनिहाय जनगणनेचा निर्णय, नाशिकमध्ये समता परिषदेचा जल्लोष

नाशिक । केंद्र सरकारने आज जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने मुंबईनाका येथे पेढे वाटून केंद्र सरकारच्या निर्णयाचे जल्लोष करण्यात आला. यावेळी समता परिषदेच्या वतीने महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.


यावेळी बोलतांना प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे म्हणाले की, या घोषणेमुळे राष्ट्रवादीचे नेते तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली सन १९९२ सालापासून सुरू असलेल्या जातनिहाय जनगणनेच्या मागणीच्या लढ्याला यश प्राप्त झाले आहे. सरकारच्या या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्र राज्य सरकारचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया त्यांनीयांनी व्यक्त केली आहे.

यावेळी प्रदेश पदाधिकारी बाळासाहेब कर्डक, नाना महाले, समाधान जेजुरकर, शहराध्यक्ष कविता कर्डक, युवक अध्यक्ष अंबादास खैरे, महिला जिल्हाध्यक्षा पूजा आहेर,महिला शहराध्यक्षा आशा भंदूरे, अमोल नाईक, मकरंद सूर्यवंशी, नाना पवार, शशी हिरवे, भालचंद्र भुजबळ, तुषार खैरे, संतोष भुजबळ, गिरीश बच्छाव,अमर वझरे, उपेश कानडे, संतोष पुंड, विनोद डोके, स्वप्निल कासार, महेश ढोले, प्रमोद बनकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!