नाशिककरांनो ! उद्या या भागातील वीज पुरवठा राहणार बंद

नाशिक । अंगाची लाहीलाही करणारया तत्प उन्हाच्या झळांनी नाशिककर हैराण झाले असतांना आता महावितरणने ऐन उन्हाळयात नाशिककरांना आणखी एक शॉक दिला आहे.द्वारका उपविभागांतर्गत इंदिरानगर कार्यालयाच्या अखत्यारित येणार्‍या शिवाजीवाडी विद्युत उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमतावाढ करण्यात येणार आहे. हे काम दोन टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे.

या कामाच्या पहिल्या टप्प्यातील काम शनिवार, ३ मे रोजी सकाळी ७ ते १२ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. यामुळे इंदिरानगर, सुचितानगर, दीपालीनगर, भारतनगर, खोडेनगर व परिसरातील वीजपुरवठा या वेळेत बंद राहणार आहे.

महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात ३३ केव्ही सिटी, ११ केव्ही पीटी आणि ३३ केव्ही कंट्रोल पॅनल बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. हे काम यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर दुसर्‍या टप्प्यात ट्रान्सफॉर्मर क्षमतावाढीचे काम पूर्ण करण्यात येईल.

महावितरणने नागरिकांना या कालावधीत वीजपुरवठा बंद राहणार असल्याची नोंद घेण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. कामाच्या कालावधीत संबंधित भागातील वीज पुरवठा पूर्णतः बंद राहणार असल्याने ग्राहकांनी आवश्यक ती पूर्वतयारी ठेवावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

सध्या नाशिकचा तापमानाचा पारा चाळीस अंशावर जाउन पोहचला असतांना नागरीकांना फॅन, एसीचा आधार घ्यावा लागत आहे त्यातच आता इंदिरानगर, सुचितानगर, दीपालीनगर, भारतनगर, खोडेनगर व परिसरातील वीजपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांना चांगलाच घाम फुटला आहे.

वीज बंद निवेदन.

त्याचप्रमाणे३३/११केव्ही शालिमार उपकेंद्रातील ११ केव्ही राजे बहादूर वाहिनीवरील विद्युत पुरवठा देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी शनिवारी सकाळी ९ ते ३ वाजेपर्यंत बंद राहील. यामध्ये एम जी रोड ,मेन रोड, चित्र मंदिर , राजे बहादूर लेन, नेहरू गार्डन परिसर ,धुमाळ पॉईंट , रेडक्रॉस ,घनकर लेन सदर परिसर बंद राहील. तरी ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरण कडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!