कोकाटेंचा राजीनामा घेणार का ?अजित पवार म्हणाले…

मुंबई । कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानसभेतील वादग्रस्त वर्तनामुळे निर्माण झालेल्या वादावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. कोकाटे यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्यावर राजीनाम्याची मागणी होत असताना, अजित पवारांनी स्पष्ट केले की यासंदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित अधिकार्‍यांच्या बैठकीनंतर घेतला जाईल.

कोकाटे यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर अजित पवार म्हणाले की, सभागृहात घडलेल्या प्रकाराची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापती यांच्यावर आहे. माझी आणि कोकाटे यांची भेट सोमवारी होणार असून, त्या भेटीत सर्व बाबींवर सविस्तर चर्चा होईल असे ते म्हणाले.

इजा झालं, बिजा झालं, आता तिसर्‍यांदा नको
कोकाटे यांच्याकडून याआधीही वादग्रस्त वक्तव्य झालं होतं, हे आठवून अजित पवारांनी त्यांना स्पष्ट शब्दांत सुनावले. राजकीय जबाबदारी असताना वर्तन आणि भाषेवर संयम ठेवणे आवश्यक आहे. मी त्यांना यापूर्वी समज दिली होती, आता पुन्हा ही वेळ येऊ नये, अशी अपेक्षा आहे, असे अजित पवार म्हणाले.

कंत्राटदार आत्महत्या प्रकरणाची चौकशी होणार
सांगली जिल्ह्यात घडलेल्या युवक कंत्राटदाराच्या आत्महत्येच्या घटनेवर बोलताना अजित पवार म्हणाले की, संबंधित कंत्राटदाराने सब-कंत्राटदाराला पैसे दिले नसल्याचे समोर येत आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना असून, याची सखोल चौकशी करण्यात येईल. तसेच, बिलांचे व्यवहार पारदर्शकपणे पूर्ण व्हावेत, यासाठीही उपाययोजना केली जातील.

error: Content is protected !!