आयपीएल पुन्हा सुरू होणार? BCCI कडून तयारी सुरू, या ठिकाणी होऊ शकतात सामनेनवीन

नवी दिल्ली । भारत-पाकिस्तान सीमावादामुळे स्थगित करण्यात आलेल्या आयपीएल 2025 स्पर्धेबाबत आता सकारात्मक संकेत मिळू लागले आहेत. बीसीसीआयने ९ मे रोजी स्पर्धेला आठवड्याची विश्रांती जाहीर केली होती. मात्र आता परिस्थिती थोडी स्थिर होत असल्याचे दिसत असून, उर्वरित सामने चार नव्या शहरांमध्ये घेण्याचा विचार केला जात आहे.

बंगळुरू, चेन्नई, कोलकाता आणि हैदराबाद ही चार शहरे संभाव्य यजमान म्हणून समोर आली असून, बीसीसीआय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. देशातील सध्याच्या सुरक्षा स्थितीच्या पार्श्वभूमीवरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

धर्मशाला सामना अचानक रद्द
८ मे रोजी धर्मशाला येथे सुरू असलेला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांचा सामना पाकिस्तानकडून झालेल्या अयशस्वी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अर्धवट रद्द करण्यात आला होता. फक्त १०.१ षटके झाल्यानंतर सामना थांबवण्यात आला. बीसीसीआयने तत्काळ निर्णय घेत सर्व प्रेक्षकांना सुरक्षित बाहेर काढले आणि सर्व संघसदस्यांना विशेष वंदे भारत एक्सप्रेसने दिल्लीला परत आणले.

बीसीसीआयचे वक्तव्य
खेळाडू आणि स्टाफची सुरक्षा ही आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्याची आहे. स्पर्धा पुन्हा सुरू करण्यासाठी आम्ही विविध पर्यायांवर विचार करत आहोत, असे बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

आयपीएलचे १६ सामने अजून बाकी
आयपीएल 2025 मध्ये १२ लीग सामने आणि ४ नॉकआउट सामने अजून खेळायचे आहेत. अंतिम सामना याआधी २५ मे रोजी नियोजित होता, मात्र आता कालांतराने तो पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!