नाशिकला मराठी भाषा अधिकारी कोण ? सामंतांच्या प्रश्नावर अधिकारी अनुत्तरीत

नाशिक : नाशिक इथं विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजन करण्यात येणार आहे. याच्या नियोजनाकरता मराठी भाषा विभाग प्रमुख उदय सामंत यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आला होत. मात्र यावेळी मराठी भाषा अधिकारी कोण ? असा प्रश्न मंत्री सामंत यांनी उपस्थित करताच अधिकारी अनुत्तरित झाले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर राज्यात मराठी भाषा विभागाच्या वतीने राज्यात विश्व मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. यापूर्वी पुणे आणि मुंबई येथे या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदाचे संमेलन नाशिक मध्ये नियोजित केलं आहे.

नाशिकमध्ये 26 ते 28 डिसेंबरं दरम्यान तीन दिवसांच हे संमेलन असेल. या संमेलनाच्या तयारीच्या दृष्टिकोनातून आज मंत्री उदय सामंत हे नाशिक दौऱ्यावर आले होते.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात या बैठकीच आयोजन करण्यात आलं होतं. बैठकीला सुरवात होताच सामंत यांनी नाशिक जिल्ह्यात भाषा विभागाचे कोण अधिकारी उपस्थित आहे असा सवाल उपस्थित केला. मात्र बराच वेळ भाषा अधिकारी कोण याच उत्तर भाषा विभागाच्या अधिकाऱ्यांनाही मिळेना.

कॅबिनेट मंत्री जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित असताना जिल्हाधिकारी कार्यालयाचे एकही प्रतिनिधी यावेळी उपस्थित नव्हते. नाही म्हणायला पुरवठा अधिकारी गणेश जाधव यावेळी उपस्थित होते पण त्यांनाही याबाबत माहिती नसल्याचे दिसून आले.

विशेष म्हणजे भाषा समिती सदस्यही या बैठकीला उपस्थित उपस्थित नसल्याने मंत्री सामंत यांनी याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली व सर्व अधिकाऱ्यांना तातडीने इथे बोलून घ्या असे सांगितले. मात्र यावरून मराठी भाषेविषयी अधिकाऱ्यांमधली अनास्था मात्र उघड झाली.

error: Content is protected !!