भविष्यात कोणत्या नोकर्‍या टिकणार, कोणत्या नाहीत?

कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणार्‍या वाढीमुळे पारंपरिक नोकर्‍यांवर संकट निर्माण झालं असून, भविष्यातील नोकरीच्या संकल्पनेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या (WEF) ‘फ्युचर ऑफ जॉब्स रिपोर्ट 2025’ वर आधारित एक विचारप्रवर्तक पोस्ट शेअर करत या बदलांची सविस्तर माहिती दिली आहे.

या अहवालानुसार, भारतासह जगभरात एआय आणि ऑटोमेशनमुळे कामकाजाच्या पद्धतीत आमूलाग्र बदल होत आहेत. पारंपरिक 4 वर्षांचे महाविद्यालयीन अभ्यासक्रम आता कालबाह्य होण्याच्या मार्गावर असून, आयुष्यभर शिक्षण घेण्याची तयारी, सतत नवीन कौशल्यांची आत्मसातता आणि तांत्रिक ज्ञान हेच भविष्यातील यशाचे खरे शस्त्र ठरणार आहे.

वाढती मागणी असलेल्या नोकर्‍या:

  1. शेती आणि कामगार क्षेत्र – शेतमजूर, डिलिव्हरी ड्रायव्हर्स, बांधकाम मजूर, अन्न प्रक्रिया कामगार
  2. सेवाभिमुख क्षेत्र – नर्सिंग, सामाजिक कार्य, समुपदेशन
  3. तंत्रज्ञान आधारित नोकर्‍या – डेटा सायंटिस्ट, फिनटेक अभियंते, एआय व मशीन लर्निंग विश्लेषक, सॉफ्टवेअर व अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपर्स

संकटात असलेल्या नोकर्‍या:

  1. कार्यालयीन कामे – कॅशियर, तिकीट क्लर्क, प्रशासकीय सहाय्यक, कार्यकारी सचिव
  2. मॅन्युअल डेटा प्रक्रिया – पोस्टल सर्व्हिस क्लर्क, बँक टेलर, डेटा एंट्री ऑपरेटर्स

महत्त्वाची कौशल्ये
2025 पर्यंत कोणत्याही नोकरीसाठी सर्वाधिक महत्त्वाचे कौशल्य म्हणजे विश्लेषणात्मक विचारशक्ती (Analytical Thinking) होणार आहे. याशिवाय लवचिकता, नेतृत्त्व क्षमता, तांत्रिक साक्षरता, नेटवर्क आणि सायबर सुरक्षा, AI आणि डेटा विश्लेषण ही कौशल्येही अत्यंत आवश्यक ठरणार आहेत.

‘फ्युचर ऑफ जॉब्स रिपोर्ट 2025’ हा नोकरी शोधणार्‍यांसाठी नव्हे, तर नोकरी देणार्‍यांसाठीही एक स्पष्ट दिशादर्शक ठरत आहे. बदलत्या काळात टिकून राहण्यासाठी सतत शिकणे, नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे आणि स्वतःला नव्या कौशल्यांनी सुसज्ज करणे ही काळाची गरज ठरते आहे.

error: Content is protected !!