महापालिका निवडणूका कधी होणार ? बावनकुळेंनी सांगितली तारीख

नाशिक । भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिलेल्या स्पष्ट आणि कठोर संदेशातून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची भूमिका अधोरेखित केली. एका विशेष कार्यशाळेत त्यांनी सांगितले की, आगामी निवडणूकीत भाजपला ५१ टक्क्यांहून अधिक मते मिळावायची आहेत याकरीता केंद्र, राज्य सरकारच्या योजना घरोघरी पोहचवा असे सांगतानाच १५ ऑगस्टच्या दरम्यान निवडणूकांची घोषणा होईल असे सांगतानाच त्यांनी बुथ यंत्रणा तयार करण्याचे आदेश दिले.

नाशिक येथे भाजपच्या उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. खुटवडनगर येथे आयोजीत या मेळाव्यात राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे, भाजपचे महामंत्री अजय सिन्हा, प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना बावनकुळे यांनी पदाधिकार्‍यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या ते म्हणाले, नेत्यांच्या मागे चमकोगिरी करून राजकारण करणार्‍यांना पक्ष निवडणुकीत तिकीट देणार नाही. मेहनत करणार्‍यांचा सन्मान होणार आहे. 13 हजार कार्यकर्ते या निवडणूकीला सामोरे जाणार आहेत. कोण काम करतो कोण नाही याची सगळी माहिती आमच्याकडे असल्याचेही ते म्हणाले.

भाजप उमेदवाराची हार होऊ द्यायची नाही
लोकसभा निवडणुकीत 51.78 टक्के मतं मिळवणार्‍या भाजपच्या संघटनेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ही ताकद उतरवावी लागेल, असं सांगताना ते म्हणाले, या निवडणुकीत प्रत्येक मत महत्त्वाचं आहे. कमळ चिन्हावर लढणार्‍या उमेदवाराची एकही निवडणूक हरू द्यायची नाही, असा संकल्प आपण केला आहे.

मोदींनी घेतला ‘सिंदूरचा बदला’
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या ११ वर्षांत देशात काय बदल घडले याची माहिती देताना बावनकुळे म्हणाले, ‘सिंदूरचा जो अपमान झाला, त्याचा बदला मोदींनी घेतला – तो दुसर्‍या कुठल्याही सरकारने घेतला नसता असे सांगत त्यांनी विरोधकांवर टिकास्त्र सोडले.

विधानसभेपुर्वी ‘लाडकी बहीण’ आणि ‘शेतकरी वीज बिल माफी’
‘लाडकी बहीण’ योजना आणि शेतकर्‍यांची ‘वीज बिल माफी’ हे निर्णय विधानसभेपूर्वी घेतले गेले असून हे केवळ निवडणुकीचे डावपेच नाहीत, तर सामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणारे निर्णय असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले.

error: Content is protected !!