लाडक्या बहिणींना कधी मिळणार जूनचा हप्ता ? तारीख जाहीर

मुंबई । राज्यातील लाखो लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी या योजनेच्या जूनच्या हप्त्यासंदर्भात अधिकृत माहिती दिली. त्यामुळं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून हप्ता कधी मिळणार याकडे राज्यातील लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं होतं त्या महिलांना दिलासा मिळाला आहे.

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार 3600 कोटी रुपयांची रक्कम डीबीटी प्रणालीद्वारे पाठवण्यात आली आहे. त्यामुळे उद्या म्हणजेच 1 जुलैपासून रक्कम खात्यात जमा होईल, हे योजनेच्या अंमलबजावणीतील महत्त्वाचं पाऊल आहे.

योजनेला एक वर्ष पूर्ण
ही योजना 29 जून 2024 रोजी सुरू झाली होती आणि योजनेला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. पहिल्या वर्षात 11 हप्त्यांचे 16500 रुपये नियमित लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. यामध्ये दर महिन्याला 1500 रुपयांची मदत दिली जाते. मे महिन्याचा हप्ता 7 जूनच्या सुमारास जमा करण्यात आला होता.

विशेष बाब – काही महिलांना दरमहा 500 रुपये
या योजनेच्या लाभार्थींपैकी ज्या महिलांना पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा लाभ आधीपासून मिळतो, त्यांना शासनाने दरमहा 500 रुपये देण्याची तरतूद केली आहे. शासनाचं धोरण म्हणजे वर्षभरात लाभार्थ्याला एकूण 18000 रुपये मिळावे, हे आहे. या विशेष श्रेणीतील महिलांची संख्या सुमारे 7 ते 8 लाख दरम्यान आहे.

error: Content is protected !!