लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता केव्हा मिळणार ? आदिती तटकरेंनी सांगितले…

मुंबई । राज्यातील कोट्यवधी महिलांनी प्रतीक्षेत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. येत्या २ ते ३ दिवसांत पात्र लाभार्थी बहिणींच्या बँक खात्यांमध्ये निधी जमा होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. तर ज्या लाभार्थींना पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून एकूण १२ हजार रुपये मिळतात, अशा लाभार्थींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दरमहा ५०० रुपये दिले जातात.

बँक खात्यांमध्ये थेट निधी जमा होणार
यासंदर्भात मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुढील २ ते ३ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल व सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट खात्यात प्राप्त होईल.

महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी कटिबद्ध
मंत्री तटकरे यांनी सांगितले की, या योजनेद्वारे राज्यातील महिलांचे आर्थिक सशक्तीकरण करण्याचा सरकारचा संकल्प अधिक दृढ करण्यात येत आहे. या निधीमुळे महिलांना आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यास हातभार लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. अनेकांना या हप्त्याची प्रतीक्षा होती. आता लवकरच हा निधी त्यांच्या खात्यात पोहोचणार आहे, हे निश्चित झाले आहे.

error: Content is protected !!