बारावीनंतर पुढे काय? जाणून घ्या तुमच्या करिअरसाठी खुल्या असलेल्या महत्त्वाच्या संधी

नाशिक। बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून आता विद्यार्थ्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न आहे – पुढे काय? कोणता कोर्स घ्यायचा, कोणती दिशा निवडायची, आणि भविष्यातील करिअर घडवण्यासाठी योग्य पर्याय कोणते, या द्वंद्वात हजारो विद्यार्थी आणि पालक सध्या अडकले आहेत. याच पार्श्वभूमीवर, बारावीनंतरच्या महत्त्वाच्या करिअर संधींचा संक्षिप्त आढावा:

१. विज्ञान शाखेनंतरचे पर्याय
अभियांत्रिकी (Engineering)
JEE (Main/Advanced) च्या आधारे IIT, NIT, किंवा राज्यस्तरीय अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश. संगणक, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, सिव्हिल अशा अनेक शाखा उपलब्ध.

२. वैद्यकीय (Medical)
NEET परीक्षेद्वारे MBBS, BDS, BAMS, BHMS, BPT यासारख्या अभ्यासक्रमात प्रवेश.
आयुर्वेद, होमिओपॅथी, फार्मसीसुद्धा लोकप्रिय पर्याय.

३. बेसिक सायन्सेस
B.Sc. (Physics, Chemistry, Maths, Biology, Biotechnology)
नंतर MSc, PhD करून संशोधन व शिक्षण क्षेत्रात संधी.

४. इतर कोर्सेस:
BCA, BSc IT, Data Science, Agriculture, Environmental Science.

वाणिज्य शाखेनंतरचे पर्याय
१. चार्टर्ड अकाउंटंट (CA) CA Foundation पासून सुरुवात. आर्थिक क्षेत्रात करिअर करण्याचा उत्तम पर्याय.

२. कंपनी सेक्रेटरी (CS), CMA कॉर्पोरेट गव्हर्नन्स व फायनान्स क्षेत्रात संधी.

३. B.Com., BBA, BMS व्यवस्थापन, आर्थिक सल्ला, बँकिंग, विमा यामध्ये करिअर. नंतर MBA, MMS करून उत्तम नोकरीच्या संधी.

४. फायनान्शियल मार्केट्स, इन्व्हेस्टमेंट अ‍ॅनालिसिस, लॉ (B.Com LL.B.) व्यवसाय व कायदा क्षेत्राचं संमिश्र शिक्षण.

कला शाखेनंतरचे पर्याय
१. B.A. (History, Sociology, Political Science, Psychology, Economics, Literature) नंतर MA, M.Phil., PhD करून शिक्षण, संशोधन, सिव्हिल सर्विसेस मध्ये संधी.

२. Journalism & Mass Communication पत्रकारिता, रेडिओ, टीव्ही, डिजिटल मीडियामध्ये करिअर.

३. Fine Arts, Performing Arts नाट्य, संगीत, चित्रकला, नृत्य यामध्ये करिअर.

४. Social Work (BSW, MSW) NGO, समाजकल्याण, मानवी हक्क यामध्ये संधी.

व्यवसाय अभ्यासक्रम / आयटीआयनंतरचे पर्याय
१. Diploma Courses in Engineering, Hotel Management, Fashion Designing, Interior Designing. हँड्स-ऑन स्किल्स व अल्पावधीत नोकरीची संधी.

२. ITI Courses (Electrician, Fitter, Welder, Mechanic इ.) औद्योगिक क्षेत्रात लगेच नोकरीचे दार उघडणारे कोर्सेस.

३. B.Voc (Bachelor of Vocation) कौशल्याधिष्ठित शिक्षणावर आधारित पदवी अभ्यासक्रम.

स्पर्धा परीक्षा व सरकारी नोकर्‍यांचे मार्ग
SSC, UPSC, MPSC, Banking, Railways, Police भरती शासकीय सेवा आणि सुरक्षित नोकरीसाठी महत्त्वाच्या परीक्षा. बारावीनंतर तयारीला सुरुवात करणे फायदेशीर ठरते.

विद्यार्थ्यांनी काय लक्षात ठेवावं?
तुमचा आवडता विषय, कौशल्ये, आणि दीर्घकालीन उद्दिष्टं लक्षात घेऊन मार्ग निवडा. फक्त ‘सर्वांना वाटतो तिथे जायचं’ ही मानसिकता टाळा. कधी कधी हटके मार्ग (Animation, Sports Management, Event Management, Culinary Arts) यशाचे दार उघडू शकतात.

करिअर सल्लागारांचा सल्ला घ्या, aptitude test करून पाहा.

error: Content is protected !!